पो.उ.नि. शीतल पालेकर यांची धडाकेबाज कारवाई कातरखटाव येथील चोरीचा पर्दा फाश
Satara News Team एकनाथ वाघमोडे
- Sat 16th Jul 2022 07:47 am
- बातमी शेयर करा

सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेरा लाख रूपये किंमतीचे पंचवीस तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेहल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करताना वडूज, दहिवडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेजस तानाजी देशमुख (वय 20) याला ताब्यात घेत,त्याच्याकडून चोरीला गेलेले सोने हस्तगत केले आहे. तेजस हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून त्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच त्याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले
सातारा – कातरखटाव (ता.खटाव) येथील केशव मेडिकलचे मालक तानाजी देशमुख यांचे बंद घर फोडून शुक्रवार (दि.15) रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेरा लाख रूपये किंमतीचे पंचवीस तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेहल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करताना वडूज, दहिवडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेजस तानाजी देशमुख (वय 20) याला ताब्यात घेत,त्याच्याकडून चोरीला गेलेले सोने हस्तगत केले आहे. तेजस हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून त्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच त्याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.याबाबत मिळालेली माहिती अशी, कातरखटाव येथील मुख्य चौकात असलेल्या केशव मेडिकलचे मालक तानाजी देशमुख यांची पत्नी शुक्रवारी सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घर बंद करून मेडिकलमध्ये गेल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात ठेवलेले पंचवीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेहले होते. ही घटना शुक्रवारी दुपारी त्यांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वडूज,दहिवडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा कातरखटाव सारख्या निमशहरी गावात चोरी झाल्याने पोलिसांकडून कसून तपास सुरु होता.मात्र, त्यांच्या हाताला काहीच लागत नव्हते. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी तेजस याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला;परंतू त्याने आईचा आसरा घेतल्याने त्यांना यश आले नाही. दरम्यान घटनास्थळी आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांनी बनसोडे व केंगले या दोन सहकार्यांसह तेजसला त्याच्याच घराच्या वरच्या मजल्यावर चौकशीसाठी नेहले.चौकशीदरम्यान त्याने संशयास्पद उत्तरे दिल्याने तासगांवकर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला मायणी पोलीस दुरक्षेत्र येथे नेहले. मायणीत तेजसला व त्याच्या एका मित्राला पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली देताना चोरलेले सोने वडूज येथे एकाच्या खोलीत ठेवल्याची कबुली दिली. गावातील मोहिते नावाच्या मित्रासोबत शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक लाॅसमध्ये गेल्याने लोकांची देणी भागवण्यासाठी चोरीचा प्रकार केल्याचे तेजसने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख हे करत आहेत.
#satara
स्थानिक बातम्या
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sat 16th Jul 2022 07:47 am
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sat 16th Jul 2022 07:47 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sat 16th Jul 2022 07:47 am
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Sat 16th Jul 2022 07:47 am
सातारा न्यूज राशिभविष्य बुधवार दि.०२ जुलै २०२५
- Sat 16th Jul 2022 07:47 am
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Sat 16th Jul 2022 07:47 am
संबंधित बातम्या
-
मुलाचा वडिलांवर डोक्यात दगड घालून तलवारीने हल्ला
- Sat 16th Jul 2022 07:47 am
-
कुमठे गावच्या सरपंचाचा पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न सरपंचावर गुन्हा दाखल
- Sat 16th Jul 2022 07:47 am
-
कराड तालुक्यात राजकीय चर्चेवेळी युवकावर कोयत्याने वार
- Sat 16th Jul 2022 07:47 am
-
खूनप्रकरणातील विवाहितेच्या भावांवर गुन्हा दाखल
- Sat 16th Jul 2022 07:47 am
-
अंजलीचा खुनाचा संशयित पती शुद्धीवर, विवाहितेच्या मृत्यूचे गूढ आज उलगडणार ?
- Sat 16th Jul 2022 07:47 am
-
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करुन मृतदेह कॉटच्या खाली झाकला कपड्याच्या गाठोड्यांनी
- Sat 16th Jul 2022 07:47 am
-
अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन त्यास मारहान केलेल्या नराधमाच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या
- Sat 16th Jul 2022 07:47 am
-
माणमध्ये परमिट रूम मध्येही देशी दारूचा ‘सुळसुळाट’
- Sat 16th Jul 2022 07:47 am