सातारा सिव्हील हॉस्पिटल आधिकारी कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी 30 कोटीचा प्रस्ताव...खा.उदयनराजे

सातारा सिव्हील हॉस्पिटलच्या अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानाच्या नुतनीकरणाचा सुमारे ३० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे या कामांना तातडीने मंजूरी द्यावी अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री ना. मनसुख मांडवीया यांना भेटुन केली. राज्याकडून केंद्राकडे शिफारस केल्या गेलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गंत ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा पाच प्रस्तावापैकी एक प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित चार कामांची मंजूरी प्रलंबीत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री ना. मनसुख मांडवीया यांची आज भेट घेवून प्रलंबीत कामांना मंजूरी देणेविषयी आणि अन्य काही मुद्यांवर चर्चा केली. सातारचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी राज्यशासनाकडे केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गंत १) उपजिल्हा रुग्णालय कराड येथे सुमारे ३३ कोटी ७६ लाख रुपये रक्कमेचे १०० खाटांच्या एमसीएच विंग इमारतीचे बांधकाम करणे. २)पाटण तालुक्यातील सणबुर या गावात आरोग्य विभागाची मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थान नुतनीकरण व बांधकाम ६ कोटी २२ लाख रुपयांचे काम. ३) कराड तालुक्यातील वडगांव हवेली येथे सुमारे ३ कोटी २ लाख रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी निवासस्थान इमारतीचे बांधकाम करणे. ४) फलटण तालुक्यातील ताथवडे येथे सुमारे ३ कोटी ६५ लाख रुपयांच्या रक्कमेची प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी निवासस्थान इमारत बांधणे. ५) महाबळेश्वर येथे रुपये ४ कोटी ५० लाख रुपयांच्या आरोग्य कर्मचारी प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम अशी एकूण ५१कोटी ३५ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली होती. राज्यशासनाकडूनही कामे ही केंद्राकडे शिफारशीसह मंजूरी करीता पाठविणेत आली आहेत. यांपैकी कराड येथील रुपये ३३ कोटी ७६ लाखांचे काम केंद्राकडून मंजूर करण्यात आलेले आहे. उर्वरित १७ कोटी ५९ लाखांच्या कामांना केंद्राने अद्यापी मंजूरी प्रदान केलेली नाही, ही वस्तुस्थिती आज ना.मांडवीया यांच्या निदर्शनास आणुन दिली. सदरची उर्वरित १७ कोटी ५९ रुपयांची चार कामे तसेच सातारा सिव्हील हॉस्पिटलच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानांबाबतचा सुमारे ३० कोटी रुपयांचा सादर करण्यात आलेला प्रस्ताव मंजूर होणे अत्यंत गरजेचे आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र आपापल्या परीने, सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यात कमी पडलेले नाहीत. कोविड-१९ च्या भयंकर संकटाचा मुकाबला मोठ्या संयमाने आरोग्य विभागाने केला आहे. आजही करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पाटण, कराड, फलटण येथील निवासस्थाने व प्रस्तावित करण्यात आलेला सातारचा निवासस्थान प्रस्तावास बांधकामास विलंब होणे इष्ट नाही. तसेच प्रशिक्षणातुन कर्मचारी घडत असतो. प्रशिक्षण मिळणे हा कर्मचाऱ्यांना मुलभुत अधिकार आणि पाया आहे. त्यामुळे महाबळेश्वर येथील आरोग्य विभागाच्या अद्यावत नवीन प्रशिक्षण इमारतीचे बांधकाम होणे अतिआवश्यक आहे. म्हणूनच उर्वरीत १७ कोटी ५९ लाखांच्या कामांना तसेच सातारच्या स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयीन अधिकारी / कर्मचारी निवासस्थानाचे रुपये ३० कोटींच्या कामास अशी एकूण ४७ कोटी ५९ लाख रुपयांच्या एनआरएचएम अंतर्गंत कामांना मंजूरी देण्यात यावी अशी विनंती सूचना ना. मनसुख मांडवीया यांना केली. आपण केलेल्या सूचनांचा आदर करतो, याकामी मी स्वतः लक्ष घालुन, या कामांना शक्य तितक्या लवकर मंजूरी देण्याची कार्यवाही करु असे आश्वासन ना. मनसुख मांडवीया यांनी याप्रसंगी या दिले आहे दरम्यान, सातारा जिल्हा हा अतिपर्जन्य आणि दुष्काळग्रस्त असा संमिश्र जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यात डोंगराळ व दुर्गम भाग मोठा आहे. त्यामुळे कोविड- १९ च्या अनुषंगाने तसेच दैनंदिन ग्रामिण आणि नागरी आरोग्य सुविधांमध्ये केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाकडून प्राधान्याने विशेष लक्ष सातारा जिल्हावासियांकडे पुरवले जावे असेही आवाहनही केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला