सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
Satara News Team
- Thu 1st May 2025 03:56 pm
- बातमी शेयर करा
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टात गुरुवारी सुनावणी पार पडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टान नकार दिला. ही सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर पार पडली. पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती.
याशिवाय, जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी केंद्र, जम्मू आणि काश्मीर, सीआरपीएफ, एनआयए यांना कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यासही सांगितले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली. पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती
. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल जनहित याचिकाकर्त्यांना कोर्टाने सवाल केला. तुम्हाला सुरक्षा दलांचे मनोधैर्य खचवायचे आहे का? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला. यापुढे असे मुद्दे न्यायालयात आणू नयेत असे निर्देशही कोर्टाने दिले आहे. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याला फटकारताना सुप्रीम कोर्टाने, "अशा जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा. तुमच्या देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे. ही वेळ अशी आहे जेव्हा प्रत्येक भारतीय दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आला आहे.
त्यामुळे आमच्या सैन्याचे मनोबल तोडू नका. ही योग्य वेळ नाही आणि या प्रकरणाची संवेदनशीलता पहा," असं म्हटलं. न्यायाधीशांचे काम वादांवर निर्णय घेणे आहे, चौकशी करणे नाही, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटलं.
"आमच्याकडे तपास करण्याचे कौशल्य कधीपासून आले आहे? तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. ते फक्त निकाल देऊ शकतात. आम्हाला आदेश देण्यास सांगू नका," असं म्हणत कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावले.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 1st May 2025 03:56 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 1st May 2025 03:56 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 1st May 2025 03:56 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 1st May 2025 03:56 pm
संबंधित बातम्या
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 1st May 2025 03:56 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Thu 1st May 2025 03:56 pm













