ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
Satara News Team
- Fri 21st Mar 2025 10:35 am
- बातमी शेयर करा
सातारा : ग्राम विकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या सातारा शहरातील महिलेला सातारा शहर पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली असून. सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.
एक कोटी रुपये खंडणी घेत असताना महिलेला पकडण्यात आल्याची माहिती आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातील एका महिलेला मानसिक त्रास दित अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार व शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला होता. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा या प्रकरणाचे मोठे पडसाद उमटले होते. या प्रकरणी त्याचे वृत्तांत करणारे एका पत्रकाराला सुद्धा अटक झाली होती.
सदर महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करत माध्यमांना मुलाखती देत विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषण करणार असल्याचे सांगितलं होतं. मात्र, शुक्रवारी सकाळी सातारा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक केली आहे. सदर महिलेने या प्रकरणी तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपये स्वीकारत असतानाच सातारा पोलिसांनी ही कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या महिलेला राहत्या घरातून अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाई संदर्भात सातारा पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे
स्थानिक बातम्या
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Fri 21st Mar 2025 10:35 am
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Fri 21st Mar 2025 10:35 am
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Fri 21st Mar 2025 10:35 am
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 21st Mar 2025 10:35 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 21st Mar 2025 10:35 am
संबंधित बातम्या
-
अखाड्यात शिंदेंच्या होमपीचवर राजेगटाचा राजकीय डाव यशस्वी; ६ विरुद्ध ५ मतांनी ठराव मंजूर
- Fri 21st Mar 2025 10:35 am
-
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्हीडीके कंपनीचा स्वच्छता ठेका रद्द
- Fri 21st Mar 2025 10:35 am
-
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Fri 21st Mar 2025 10:35 am
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Fri 21st Mar 2025 10:35 am
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 21st Mar 2025 10:35 am












