सातारा जिल्ह्यातील सैनिक फाउंडेशनची नवीन कार्यकरणीची नियुक्तीपत्र खा.ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या हास्ते वाटप

सातारा : सैनिक फेडरेशनचे राज्याध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा सध्या पश्चिम दौरा चालू आहे. यावेळी सातारा येथे शासकीय विश्रामगृहावर ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सैनिकांना मार्गदर्शन केले. सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात सर्वात जास्त सैनिक आहेत. असे गौरोद्गार सावंत यांनी काढले. यावेळी सातारा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशनची नवीन कार्यकारणीची पद नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये सातारा जिल्हाध्यक्ष विजयराव जमदाडे, महिला जिल्हाध्यक्ष विद्या संतोष बर्गे, जिल्हा कार्याध्यक्ष राजू केंजळे, जिल्हा सचिव संतोष बर्गे, जिल्हा संघटक रवींद्र शेळके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण नलावडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप साळुंखे, जिल्हा सचिव महिला दिपाली भोसले, जिल्हा महिला ब्रिगेड उपाध्यक्ष सुनिता देवी सावंत, जिल्हा संघटक कांचन घोरपडे, कराड तालुका अध्यक्ष स्वाती बोराटे यांना पदनियुक्ती देण्यात आली. यावेळी सैनिक फेडरेशनचे महासचिव डी एफ निंबाळकर, उद्योग विभाग अध्यक्ष समाधान निकम, पश्चिम महाराष्ट्र उद्योग विभाग प्रशांत कदम (माजी जिल्हाध्यक्ष), उपाध्यक्ष उर्मिला पवार, विलास जगताप पश्चिम महाराष्ट्र संघटक तसेच अकरा तालुक्यातील तालुकाध्यक्ष, महिलाध्यक्ष, वीरपत्नी, वीर माता-पिता तसेच जिल्ह्यातील सर्व आजी-माजी सैनिक व सैनिक मित्र या कार्यक्रमास उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त