केसांबरोबर खिशाला ही लागणार कात्री

दाढी व कटिंगच्या दरात २० टक्के वाढ

सातारा : नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून दाढी व कटिंगच्या दरात २० टक्के वाढ करण्यात आली आहे. शहरात दाढी १००, तर कटिंग १५० रुपये, तर ग्रामीण भागात दाढीला ७० व कटिंगला १०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याशिवाय चेहरा फेशियलच्या दरातही मोठी वाढ झाली असून, साहित्याच्या दरात वाढ झाल्यानेच ही दरवाढ करण्यात आलेली आहे. ही दरवाढ संपूर्ण सातारा जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, शहरी व ग्रामीण भागासाठी वेगवेगळी दरवाढ आहे. सातारा येथे दि. ३० डिसेंबर रोजी महामंडळाच्या सातारा जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला शंकर दळवी, माजी अध्यक्ष शंकर मर्दाने, राज्य कार्यकारिणी सदस्य विठ्ठल गायकवाड, जिल्हाध्यक्ष संतोष साळुंखे, जीवन मसूरकर, दत्तात्रय दळवी, अजय काशीद आदी उपस्थित होते. या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.

 दरवाढीची ‘ही’ कारणे सलून साहित्यांच्या दरात झालेली वाढ कामगार पगाराऐवजी दिवसभरात होणाऱ्या व्यवसायाच्या ३० टक्के द्यावे लागतात. दुकानाच्या जागा भाड्यात वाढ घरफाळा व पाणीपट्टीची कमर्शियल म्हणून आकारणी जानेवारीपासून 20 % वाढ गेल्या तीन-चार वर्षांत महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य माणसाला जगणे मुश्कील बनले असून त्याचे परिणाम आता छोट्या व्यावसायिकांवर होऊ लागले आहेत. त्यातूनच सलून व्यावसायिकांनी दरात वाढ केली आहे. महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ व महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन मुंबई यांनी १ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात चालू दरात सरसकट २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साहित्याच्या दरात दुप्पट वाढ सलूनमध्ये लागणाऱ्या साहित्याच्या दरात गेल्या दोन-तीन वर्षात दुप्पट वाढ झाली आहे. ब्लेड तयार करणाऱ्या कंपन्यांनी मात्र किरकोळ वाढ केली असली तरी इतर साहित्य महागल्याने दाढी व कटिंगचे दर वाढवावे लागल्याचे सांगण्यात येते.

 १ जानेवारीपासून करण्यात आलेले नवे दर साधी कटींग : १२० स्टाईल कटींग : १५० साधी दाढी : ६० स्पेशल दाढी : ७० फोम दाढी : ८० स्टाईल दाढी कोरणे : ८० लहान मुलांची/मुलींची कटींग : १०० झीरो मशीन दाढी : ६० कट लाईन : १०० सपाट केस करणे : १०० साधा मसाज : १०० स्पेशल मसाज (क्वालीटी नुसार) : १५० दाढी कलर करणे : ९० हेअर कलर क्रिम लावणे : २०० हेअर डाय पावडर लावणे : १२० हाय लाईट १ पॉइंट : १०० ब्लीचींग क्वालीटी नुसार : ५०० फेशिअल क्वालीटी नुसार : ७०० जावळ काढणे : ५०१ मिशी कलर करणे : ३० 

 १ जानेवारीपूर्वीचे जुने दर साधी कटींग : ८० स्टाईल कटींग : १०० साधी दाढी : ५० स्पेशल दाढी : १०० फोम दाढी : ७० स्टाईल दाढी कोरणे : ६० लहान मुलांची/मुलींची कटींग : ७० झीरो मशीन दाढी : ५० कट लाईन : ८० सपाट केस करणे : ७० बगल काढणे : ३० साधा मसाज : ८० स्पेशल मसाज (क्वालीटी नुसार) : १०० दाढी कलर करणे : ८० हेअर कलर क्रिम लावणे : १५० हेअर डाय पावडर लावणे : १०० हाय लाईट १ पॉइंट : १०० ब्लीचींग क्वालीटी नुसार : ५०० फेशिअल क्वालीटी नुसार : ७०० जावळ काढणे : ५०१ मिशी कलर करणे : ३०

 साहित्याच्या दरात वाढ अशी ब्लेड (५० ब्लेड) : ९० रुपये पूर्वीचे दर आणि आताचे १०० रुपये कार्बन कंगवे : १०० रुपये पूर्वीचे दर आणि आताचे ३५० रुपये लोशन : १२० रुपये पूर्वीचे दर आणि आताचे ३०० रुपये हेअर कलर ट्यूब : ३१० पूर्वीचे दर आणि आताचे ३२५ रुपये कात्री : १५० पूर्वीचे दर आणि आताचे ३०० रुपये पासून पुढे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त