सन 2019 पूर्वीच्या वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट' बंधनकारक
Satara News Team
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
- बातमी शेयर करा

सातारा : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करुन होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसविणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, फलटण या कार्यालयाच्या अभिलेखावर नोंद असलेल्या वाहनांकरिता Zone No.2 मध्ये M/s Real Mazon India Ltd. या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहनधारकांच्या सोयीकरिता सदर कंपनीचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट फिटमेंट सेंटर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरु करण्यात आले आहे.
वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या https:/transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट करिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येतील. तसेच वाहनधारकांना आपल्या नजीकच्या कंपनीचे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट फिटमेंट सेंटरवर अपॉईमेंट घेऊन सदरची सुविधा घेता येईल.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याकरिता वाहन प्रकार निहाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट शुल्क जीएसटीसह - टु व्हिर्लस व ट्रॅक्टर्ससाठी - रु. 531/-, थ्री व्हिर्लससाठी - रु. 590/-, लाईट मोटार व्हेईक्ल्स/पॅसेंजर कार/मेडियम कर्मशिअल व्हेईक्ल्स/हेवी कर्मशिअल व्हेईक्ल्स आणि ट्रेलर/कॉम्बिनेशनसाठी - रु. 879.10/- वरीलप्रमाणे शुल्क आकारण्यात यईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.
सातारा आणि फलटण कार्यालयातील जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट कंपनी फिटमेंट सेंटर पुढीलप्रमाणे. कोरेगाव - सातारा पंढरपूर रोड, वसुधा पेट्रोलपंपाशेजारी. सातारा-हेम कंपनी, फ्लुरा हॉटेलजवळ, वडूज- वरद ॲटोमोबाईलजवळ कराड रोड, खंडाळा- शिवाजी चौक मार्केट यार्ड गाळा खंडाळा लोणंद रोड, वाई - वाई बावधन रोड अर्थव आदित्य फटाका जवळ, फलटण- शिंगणापूर रोड समर्थ ऑफसेट अजित नगर कोळकी, दहिवडी- मायणी रोड बीएसएनल ऑफीसच्या समोर, महाबळेश्वर- नॅशनल गॅरेज टॅक्सी स्टँड दत्त मंदिर जवळ (संपर्क क्र. 8275370068)
satara
satararto
स्थानिक बातम्या
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज २६/६/२०२५ गुरुवार
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
संबंधित बातम्या
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Mon 13th Jan 2025 05:31 pm
-
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Mon 13th Jan 2025 05:31 pm