पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ च्या रुग्णवाहिकेचे आमदार घोरपडेंच्या हस्ते लोकार्पण

पुसेसावळी : पुसेसावळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला २०११ साली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गरोदर माता आणि एक वर्षांपर्यंतच्या बालकांना तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात यावी यासाठी १०२ संपर्क क्रमांक असलेली टाटा सुमो एम.एच.११ ए.बी.८१२१ रूग्णवाहीका दिलेली होती. त्याचे शासकीय नियमानुसार २ लाख ४० हजार किलोमीटर पुर्ण होणे अपेक्षित असते त्यानुसार २ लाख ५२ हजार किलोमीटर पुर्ण झाल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने फोर्स कंपनी ची एम.एच.११ डि.डि. ८३३१ हि १०२ संपर्क क्रमांक असलेली फक्त गरोदर माता आणि एक वर्षांपर्यंतच्या बालकांना वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक मोठी रूग्णवाहीका दिली आहे. १०२ च्या नव्याने देण्यात आलेल्या रूग्णवाहीकेचे पुजन करून लोकार्पण कराड उत्तर चे आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, वर्धन कारखान्याचे संचालक विक्रमशील कदम, सौ.सुनंदा नामदेव पिसे, सरपंच पुसेसावळी, डॉ. युनुस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ.अजिंक्य पुस्तके, वैद्यकीय अधिकारी, डॉ. दिक्षा पांढरबळे, वैद्यकीय अधिकारी, डॉ.तुषार खाडे, वैद्यकीय अधिकारी, श्रीमती वैशाली गुजर, आरोग्य सहाय्यक, बी.एन.घाडगे, आरोग्य सहाय्यक, अनिल बोराटे, औषध निर्माण अधिकारी, महेंद्र खोत, कार्यालयीन सहाय्यक, शुभांगी माळी, पुष्पा खैरमोडे, ज्योती शिंदे, नयन पंडीत, साक्षी विभुते, संगिता साळुंखे, मुक्ता गवळी, महेश काशीद, एम. बी.देशमुखे, प्रविण देशमुखे इत्यादी आरोग्य सेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त