अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी

राष्ट्रवादीच्या ठासळलेल्या किल्ल्याची तटबंदी मजबूत होणार?

सातारा : शरद पवार आणि अजित दादा यांचा गट एकत्र येऊन राष्ट्रवादी पक्ष पुन्हा तयार व्हावा, अशी अनेकजण इच्छा व्यक्त करत आहेत. याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात असताना साताऱ्यात मात्र अजितदादा आणि शरद पवार गटातील नेतेमंडळींची चांगलीच गट्टी जमल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होते कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलाचे भूमीपूजनाचे. कोरेगाव येथे शेती उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलाचे भूमीपूजन पार पडले. 

      विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर तर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते या संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र आ.शशिकांत शिंदे यांचे विरोधक व कोरेगावचे भाजपचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख ही नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच कार्यक्रमा दरम्यान, मंत्री मकरंद आबा, रामराजे निंबाळकर आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये बराच वेळ गुफ्तगू चर्चा ही पाहायला मिळाली.

   दरम्यान, या कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर ही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नावांसह फोटो ही कार्यक्रमाच्या बॅनरवर पाहायला मिळाले. मात्र जिल्ह्यातील राष्ट्रवादी सख्य जपत असताना अजितदादांचा फोटो मात्र गायब असल्याचे दिसून आले. मकरंद पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचे बॅनर पाहायला मिळाले होते. 

त्यामुळे राज्यात काहीही उलथापालथ होत असली तरी राष्ट्रवादीच्या ठासळलेल्या या बालेकिल्ल्यात नेतेमंडळींची हि जमलेली गट्टी भविष्यातील राष्ट्रवादीच्या किल्ल्याची तटबंदी मजबूत करण्यासाठी तर नाही ना? अशी चर्चा आता सुरु झालीय.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त