करंजे येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा

सातारा : शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, करंजे पेठ, साताराचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्या म्हणून सातारा शिक्षण विस्तार अधिकारी मा. सौ. जयश्री गुरव मॅडम तसेच अध्यक्ष म्हणून लोकमंगल शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा. श्री.शिरीषजी चिटणीस सरही उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील जीवन मूल्यांचे महत्व यावर मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शाहू कला मंदिर पासून सुरु झालेल्या शाळेच्या प्रवासात पालकांच्या सहकार्य व शाळेचा चढता आलेख मांडून शुभेच्छा दिल्या.शून्यातून उभी राहणारी तसेच वटवृक्षांमध्ये रूपांतर होणारी शाळा व यासाठी पालकांची व करंजे ग्रामस्थांची होणारी मदत याबद्दल सर्वांचे आभार मानले. शाळेच्या या चढत्या आलेखात संस्थेचे सचिव मा. श्री. तुषार पाटील सर यांचे काटेकोर नियोजन फार महत्वाचे आहे. त्यांच्या या नियोजन व नवोपक्रम यांमुळेच शाळेचा नावलौकिक सातारा शहरात व शहराबाहेर व देशाबाहेरही होत आहे.

    इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण फार सुंदररित्या केले.यावेळी भारतीय संस्कृतीला अनुसरून नृत्य व गीते सादर करण्यात आली. तसेच विदयार्थ्यांनी तयार केलेल्या "ब्लॉसम " या हस्तलिखिताचे प्रकाशनही मान्यवरंच्या हस्ते करण्यात आले.या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,संस्थाचालक व सर्व पालकांनी भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध प्रकारची कलादालने शाळेमध्ये तयार केली जातात की जिथे सर्व विषयांना अनुसरून विद्यार्थी आपली कलाकृती मांडत असतात. यामध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विषयानुसार तिथे आपली कलाकृती सादर केली. मा.डॉ.सौ. सुनिता जाधव मॅडम, ऍडव्होकेट मा. सौ. स्मिता सिन्हा मॅडम व सर्व संस्थाप्रमुख, मान्यवर व पालक यांच्या हस्ते सर्व कलादांनांचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमास सर्व पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यानंतर शाळेमध्ये " फूड फेस्टिवल" भरविण्यात आले. 


  • satara
  • आम्हाला जोडण्यासाठी

    संबंधित बातम्या

    सुयोग डेव्हलपर्स
    छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
    सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
    चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
    ठोसेघर धबधबा फेसाळला
    मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त