मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ३ डिसेंबर ला संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी
Satara News Team
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
- बातमी शेयर करा
या तपासण्या होणार सर्व पत्रकारांचा ईसीजी काढला जाईल. रक्त, लघवी आणि शुगर तपासणी. किडनी आणि लिव्हर तपासणी, डोळे, कान, दात तपासणी त्याबरोबरच छातीचा एक्सरेही काढण्यात येईल. एचआयव्ही, उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब याबाबतच्याही तपासण्या यावेळी करण्यात येणार आहेत,या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा पत्रकार संघाने केले आहे.
सातारा : मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्हा पत्रकार संघ ,डिजिटल मीडिया परिषद आणि क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पत्रकारांसाठी विविध प्रकारच्या तपासण्या आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत या तपासण्या होणार आहेत.
पत्रकारांना दैनंदिन जीवनात अनेक ताण तणावांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापनदिन हा पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी घेतला आहे. यानिमित्ताने राज्यभरात सुमारे १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचीही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सातार शहर आणि तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी ही क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय येथे रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत करण्यात येणार आहे.
तर सर्वच तालुक्यात देखील त्याठिकाणच्या उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रूग्णालयात पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी संबंधित प्रमुखांना लेखी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्या त्या तालुक्यातील सर्व पत्रकारांनी जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये आपल्या सर्व तपासण्या करुन घ्यावयाच्या आहेत.तालुका पत्रकार संघानी या बाबत चे नियोजन करावे.या निमित्ताने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून त्यामध्येही सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधीस्वीकृती समिती चे सदस्य चंद्रसेन जाधव ,जिल्हा सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे ,परिषद प्रतिनिधी सुजीत आंबेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहूल तपासे, समन्वयक शंकर मोहिते, डिजिटल मिडियाचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे,राज्य महिला संघटक विद्या नारकर यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 24th Nov 2023 07:05 pm
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Fri 24th Nov 2023 07:05 pm










