बारबाला पुरवणारा सुत्रधार कोण ? साताऱ्याचा की कोरेगावचा; सातारकरांमध्ये चर्चा.
साताऱ्याच्या संस्कृतीला छमछमचे ग्रहण; संस्कृती बिघडवण्याचे पाळेमुळे खोदण्याचे पोलिसांपुढे आव्हानधिरेनकुमार भोसले
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
- बातमी शेयर करा
सातारा : बाई, बाटली अन पैसा हे गुन्हेगारीचे मुळ केंद्र म्हटले जात आहे. जिथे- जिथे या गोष्टीचा संबंध येतो, तिथे-तिथे गुन्ह्याला खतपाणी मिळत असते. डान्स बारमध्ये या तीन्ही गोष्टी येत असतात. त्यामुळेच डान्सबार यांचा जवळचा संंबंध राहिला आहे. काळा पैसा, बारबालांच्या सौंदर्याचे मायाजाल आणि मद्याची नशा गुन्हेगारीस प्रवृत्त करत असते. कधीकाळी मुंबई-पुणे येथे रुजलेली ही बारबालाची संस्कृती आता साताऱ्यात रूजू पाहत आहे. चार दिवसांपूर्वी सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बारबालाची छमछम आता गावगाड्यातील पारावरही समजली. सातारा तसा मराठ्यांची राजधानी, शांत, संयमी अन पेन्शनरांचा अशा संस्कृतीला बारबालाच्या छमछमने मात्र ग्रहण लागले. या संस्कृतीची पाळेमुळे आता खोदण्याचे आव्हान सातारा पोलिसांपुढे असले तरी साताऱ्यात बारबाला पुरविणारा सुत्रधार नेमका कोण? साताऱ्याचा की, कोरेगावचा याबाबत सातारकरांमध्ये आता उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

पेट्री ता. सातारा येथील राज कास हिल रिसॉर्टवर सातारा तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी कारवाई केली. यामध्ये सातारा, कोरेगाव तसेच कराडपर्यंतचे राजकीय मात्तबरांसह साताऱ्यातील बिर्याणी हाउसचे मालक असे ५८ जण बारबालावर पैसे उधळत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मध्यरात्री १ वाजल्यापासून पहाटेपर्यंत झालेल्या कारवाईत या साऱ्यांचीच एकच पळापळ सुरु झाली. त्यावेळी या कारवाईत काहींच्या गाड्या ताब्यात घेतल्या. तर ८१ हजारांची रोकडसह मोबाईल हॅडसेट, साउंड सिस्टीम लाईट असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
वास्तविक यामधील स्थिती पाहिली तर बऱ्याच बाबी आजही पडद्यामागेच आहेत. राज कास हिल रिसॉर्टवर येथे सुरु असलेल्या बारबालांचा डान्स हा काही अचानकपणे त्याच दिवशी सुरु होता का? तर नाही. येथे फक्त याच हॉटेलवर बारबालांचा डान्स होता की सांबारवाडीपासून कासपर्यंत असणाऱ्या अजुन काही हॉटेलवर होता. हे प्रश्न मात्र आजही अनुत्तरीतच आहेत. याशिवाय ज्या राज कास हिल रिसॉर्टवर कारवाई करण्यास सातारा तालुका पोलिस गेले. त्यापूर्वी तेथील सीसीटीव्ही कॅमेराने बरच काही टिपलं होते. बारबाला पाहणारे अन त्यांच्यासमवेत वेळ घालवण्यासाठी शरीराची अय्याशी करण्यासाठी ही संख्या ५८ पर्यत असल्याचे काहींच्या कॅमेराने टिपले असल्याचे बोलले जात आहे. तर एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये झालेल्या कारवाईत बारबालांवर पैसे उधळणारे १८ अन मालक, चालक अन वेटर असे २१ जणांना ताब्यात घेवून कारवाई केली. पण प्रश्न असा येत आहे की, राज कास हिल रिसॉर्टमध्ये सहा बारबाला तोकडया कपड्यात मादक होत तरुणाईची करमणूक करत होते. तर या कारवाईत एकच वेटर ताब्यात घेतल्यामुळे हा एवढा मनोरंजनाचा सराजमा पाहता एकच वेटर या साऱ्या ५८ जणांना सेवा कशी देत असावा. कारण बारबालांचे कमनीय देह पाहताना भान हरपलेले तरुणाई ही क्षणाक्षणाला वेटर इकडे ये, असा नारा देत बाटली अन जाम आणण्यास भाग पाडत होते. मग हा एकटा वेटर या ५८ जणांना खरचं सुविधा देण्यात सफल झाला असेल तर महाराष्ट्रातील विविध हॉटेलमधून त्याला भविष्यात मागणी आल्याशिवाय राहणार नाही. यामधील गोलमाल नेमकं कोण-कोणाच्या हितासाठी केलं असाव याच्या सुरस कथा मात्र आज सातारकरांमधून चर्चिल्या जात आहेत.

राज कास हिल रिसॉर्टचे मालक हे मुळचे नागठाणे येथील नंदु नलावडे. यांचा मुळ गावी असणार अंथरुण म्हणजे व्यवसाय हा वीटभट्टीचा अन वडाप चालवण्याचा व्यवसाय पण हळूहळु अनेक घरांच्या इमल्यांना ही वीट देता- देता ओळखी दूरदूरवर वाढू लागल्या. तर वडाप व्यवसायामुळे दररोजच सातारा शहराच्या उणीव अन यामधून आपलं वेगळ विश्व कस उभारायचं हे ठरवू लागला. दरम्यान, साताऱ्यातील एका राजाच्या वळचणीला हा आला. अन तेव्हापासून तो त्यांचा फॅन अन समर्थक बनला. आता याचा परिपाक म्हणून काही वर्षापूर्वी बुध्दीबळाच्या सारीपटावरील हे प्याद एक-एक घर पुढे जाण्याचं ठरवू लागलं त्याप्रमाणे सिव्हील कॉलनी संभाजीनगर येथे घर घेवून राहयला आला. आता बऱ्यापैकी बस्तान बसले. सातारा शहरानजिक असणारे संभाजीनगर हे विशेषत: नोकरदार मंडळींचे म्हणून ओळखले जाते. इथे ग्रामीण भागातून येवून सत्तेच्या प्रवाहात येण्याचं स्वप्न पाहणे म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने या प्रमाणे असते. पण नंदु नलावडे यांनी मात्र आपल्याला आता राजाश्रय मिळाला या अविर्भावात येथील ग्रामपंचायतीच्या राजकारणात उडी घेतली अन यशस्वी झाला. या संभाजीनगर ग्रामपंचायतीमध्ये नंदु नलावडे यांनी सौ. यांना राजकारणात उतरुन सदस्य करत पहिली पायरी चढली त्यानंतर अखेरच्या टप्प्यात या संभाजीनगरच्या डेप्युटी सरपंच करण्यात ते यशस्वी झाले.

आता आयुष्याची पावले पुढे सरकत असली तरी खिसा अर्थकारणाच सुत्र नविन निवडण्यास सांगितले जात असते पण हा मात्र आहे त्यात झ्याकी करत स्वत:ला धन्य मानत असे. दरम्यान, आता अर्थकारणाचे नवीन पाउल त्याने पेट्री येथे जमिन खरेदी करत राज कास हिल रिसॉर्ट या नावाने सुरु केले अन अर्थकारण वाढू लागलं. या दरम्यान संपूर्ण कुटुंबच या हॉटेल व्यवसायत रमलेलं अनेकांनी पाहिलं आहे. पण बुध्दीबळाच्या सारीपाटात नंदु हा सबका बंदू असं करत आपल्याला राजाश्रय आहे. अशा अविर्भावात वाटचाल करु लागला. हळुहळु बुध्दीबळाच्या घरात एकटाच राजा होण्याचे स्वप्न पाहू लागला. अन कमी वेळात मोठी 'माया' मिळवण्याचं ठरवलं. या कामासाठी त्याने बारबालाच्या माध्यमातुन पुढे जाण्याचं ठरवलं. यासाठी कधी कोरेगाव तर सातारा असा सारीपाट खेळत बारबाला अखेर आणल्या. यासाठी राजाश्रय कधीच मिळाला नव्हता पण त्यांच्या नावाची झालर मात्र या नंदुने वापरली एवढी मात्र जमेची बाजू ठरली. हळूहळु आता या रिसॉर्ट शेजारी असणारी दोन एकर शेती आपल्याच मिळावी यासाठी शेजारीला शेतकऱ्यालाही अनेकदा सळो की पळो करुन सोडले. आता ती ही प्रॉपटी आपणांस मिळणार अन व्यवसाय अधिक वाढणार असे मनसुबे रचणारा नंदु कधी कधी सबका बंदु असल्याचा दिखावा करणारा मात्र बारबालांच्या जाळ्यात साताऱ्यातील तरुणाईला ओढत होता. त्याचवेळी झालेल्या कारवाईत मात्र कायद्याच्या जाळ्यात तोच अडकला.

नंदु हा सबका बंदुचा दिखावा करणाऱ्याची पालखी सातारा तालुका पोलिसांनी उचलली अन आता त्यांनी न्यायालयाच्या दारात नेवून ठेवली. त्यामुळे एका क्षणात होत्याच नव्हत झालं. त्यावेळी त्याचेच मित्र म्हणू लागले कोण होतास तू काय झालास तू या १९७५ मधील 'झुंज' मराठी चित्रपटातील गाण्याची आठवण करुन देवू लागले. असा कसा तू वाया गेलास रे...! नंदुच्या हॉटेलवरील या कारवाईमुळे मात्र, यापुढे तरी सातारकर बोध घेवून आपल्या मुळ संस्कृतीकडे वाटचाल करतील, अशी अपेक्षा सातारकरांमधून व्यक्त होवू लागली आहे.
...........................................
डान्सबार हप्तेबाजीचे कुरण बनवू नका
सर्वसमाान्य घरातील तरुणांना वाममार्गाला लावणाऱ्या डान्स बारमुळे गुन्हेगारी वाढण्याची भीती असतेच. बारबालांवर एका रात्रीत होणारी लाखो रुपयाची उधळण पाहिल्यावर अमाप पैसा कमावण्याच्या लोभाने कित्येक तरुण गुन्हेगारी जगताकडे वळल्याचे पुणे-मुंबईतील डान्सबारमध्ये पाहिल्याचे अनेकजण दाखले देत असतात. त्याचवेळी गुन्हेगारी जगतात पैशाला डान्स बारमध्येच पाय फुटत असतात. त्यावेळी साध्या कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच वरकमाईचा राजमार्ग ठरला जात असतो. पोलिसांसह सर्वच सरकारी यंत्रणांच्या हप्तेबाजीचे मोठे कुरण डान्स बार म्हणुन पाहिले जावू शकते. त्यामुळे जे पुणे-मुंबईत कालपर्यत घडतं असं बोलले जाते, ते साताऱ्यात रुजू नये, यासाठी सातारा पोलिसांनी अशा संस्कृतीची पाळेमुळेच खाणून काढावीत, अशी अपेक्षा सातारकरांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
..........................................
नंदु सबका बंदु नव्हे तरुणाईला अडकवतो बारबालांच्या जाळ्यात
डान्सबारमध्ये जायचे तर बक्कळ पैसा हवाच आणि साहाजिकच कष्टाने मिळवलेला पैसा कुणी
डान्स बारमध्ये उडवि णारही नाही. हा पैसा भ्रष्ट मार्गाने कमविलेला किंवा गुन्हेगारीच्या मार्गाने मिळवलेला असतो किंवा वरकमाईचा असतो किंवा अतिश्रीमंतीचा पैसा. हा पैसा उडविण्यासा
ठी मग मुंबई, पुणे येथील डान्स बारकडे पावले वळयाची अन कळत नकळत पुढचे पाउल गुन्हेगारीकडे वळायचे. त्या झगमगाटाची लागलेली सवय किंवा नशा मग नर्तिकेची निर्माण झालेली ओढ तिच्यावर फिदा झाल्याने तिला खुष करण्यासाठी मग तिच्यावर उध
ळलेला पैसा, बारबालेशी निर्माण झालेले प्रेमसंबंध आणि मग त्यातून पुढे तिचीच हत्या करण्याचे प्रकार पुणे मुंबईत घडत असतात ते येथे होण्याचे नाकारु शकत नाही. असली संस्कृती नागठाणेच्या नंदुने आपल्याला राजाश्रय असल्याच्या अविर्भावात बारबालांसह हॉटेल सुरु केलं. पण वास्तवात त्याला राजाश्रय नव्हे त्याची झालर स्वत:च त्याने पांघारली होती. आता या बाबीही पोलिस तपासात किती पुढे येतील हा सातारकरांसाठी औत्सुक्याचा विषय राहणार आहे.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Wed 1st Nov 2023 01:54 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Wed 1st Nov 2023 01:54 pm













