महामार्गावर मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हलचा टायर फुटून ट्रॅव्हलस पेटली

सातारा ; पुणे – बंगळूर महामार्गावर मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या एका खासगी ट्रॅव्हलच्या पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम गरम झाल्यामुळे टायर फुटून ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला.

ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून, सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र, संबंधित ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईहून कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीकडे जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आज सकाळी सातारा बाजूकडून तासवडे टोल नाका परिसरात आली. ट्रॅव्हल्समधून सुमारे ४० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांचे साहित्य व अन्य साहित्यही यात ठेवण्यात आले होते. त्यामुळे ट्रॅव्हल्सचा पाठीमागील चाकाचा ब्रेक ड्रम गरम होऊन टायर अचानक फुटला. त्यानंतर काही समजण्यापूर्वीच ट्रॅव्हल्सने पेट घेतला.

सुदैवाने आग डिझेल टाकीपर्यंत जाण्यापूर्वीच विझवण्यात अग्निशमन दलास यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र तळबीड पोलिसांसह महामार्ग पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली.

 

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त