साताऱ्यातील धक्कादायक घटना बोरिंग मशीनमध्ये सापडल्याने कामगाराच्या शरीराचे झाले तुकडे
- Satara News Team
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
- बातमी शेयर करा
सातारा : महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावर काम सुरू असताना बोरिंग मशीनमध्ये सापडून एका तरुण कामगाराच्या शरीराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली. करुणेश कुमार (वय २९, रा. अतीत, ता. सातारा, मूळ रा. खरचाैली महाराज गंज उत्तर प्रदेश) असे मशीनमध्ये सापडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महामार्गालगत खेड फाट्यावर गॅस पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. करुणेश कुमार हा पोकलेन ऑपरेटर म्हणून त्या ठिकाणी कामाला होता. बोरिंग मशीनद्वारे खड्डा खणल्यानंतर तो खड्डा पाहण्यासाठी खाली उतरला होता. त्यावेळी तोल जाऊन त्या खड्ड्यात तो पडला.
मात्र, तो खड्ड्यात पडल्याचे कोणाला दिसले नाही. ज्या खड्ड्यात तो पडला होता. तो खड्डा पुन्हा आणखी खोल खणण्यासाठी बोरिंग मशीन सुरू करण्यात आली. त्यामुळे त्याच्या शरीराचे अक्षरश: तुकडे-तुकडे झाले. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. मात्र, ही घटना त्याच रात्री उशिरा उघडकीस आली.
यानंतर कामगारांनी करुणेश कुमारच्या शरीराचा एक-एक तुकडा खड्ड्यातून बाहेर काढला. हा प्रकार नेमका कोणाच्या हलगर्जीपणामुळे झाला, हे अद्याप समोर आले नाही. करुणेश कुमारच्या मृतदेहाचे तुकडे जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशहून त्याचे नातेवाइक साताऱ्यात पोहोचले असून, नातेवाइकांनी अद्याप त्याचा मृतदेह ताब्यात घेतला नाही. या घटनेला कोण जबाबदार आहे, याबाबत संबंधित कंपनी आणि नातेवाइकांमध्ये चर्चा सुरू आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार धनाजी यादव हे अधिक तपास करीत आहेत.
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
संबंधित बातम्या
-
वाई बस स्थानकासमोर अपघात ,एकाचा मृत्यू चार जखमी.
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
-
महामार्गावरील खांबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकर व तीन कारचा विचित्र अपघात
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
-
शिरवळ जवळ भीषण अपघात; तरुणीचा जागीच मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
-
तासवडे एमआयडीसी मध्ये भीषण स्फोट होऊन कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
-
ट्रॅक्टरखाली सापडून ग्रा.पं. सदस्याचा मृत्यू
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
-
शहरातील डी-मार्ट नजीक खाणीत सडलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह फलटण येथील तांबोळी यांचा
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
-
संभाजीनगर कमानी समोर राष्ट्रीय महामार्ग वर ट्रॅक्टर व ट्रॉली थरार
- Tue 18th Jul 2023 09:38 pm
-
महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटवर उडी मारून व्यक्तीची आत्महत्या
- Tue 18th Jul 2023 09:38 pm