फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते शुभारंभ
Satara News Team ओंकार सोनावले
- Mon 4th Jul 2022 10:03 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज : सातारा दि. 4 : उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांच्या न्यायालय आपल्या दारी या योजने अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये फिरते लोकन्यायालयाच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्यालयातील सर्व जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, जिल्हा सरकारी वकील आणि कर्मचारी उपस्थित होते.

या फिरत्या न्यायालयाचे कामकाज निवृत्त न्यायाधीश भारत खटावकर हे पाहणार आहेत. या न्यायालयाचे कामकाज दि. 4 जुलै ते 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुढील ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
दि. 4 व 5 जुलै 2022 रोजी मेढा, दि. 6 व 7 जुलै महाबळेश्वर, दि. 8, 11 व 12 जुलै वाई, दि. 13 व 14 जुलै खंडाळा, दि. 15,16 व 18 जुलै फलटण, दि. 19 व 20 जुलै दहिवडी, दि. 21 व 22 जुलै म्हसवड, दि. 25,26 व 27 जुलै वडुज, दि. 28, 29 व 30 जुलै कोरेगांव, दि. 1 व 2 ऑगस्ट पाटण, दि. 3,4, 5 व 6 ऑगस्ट 2022 रोजी कराड या तालुक्यांत फिरते लोकन्यायालयाचे मोबाईल व्हॅन जाणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली करण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी केले आहे.
suprimcort
sataracort
loknayalay
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 4th Jul 2022 10:03 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 4th Jul 2022 10:03 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 4th Jul 2022 10:03 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 4th Jul 2022 10:03 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 4th Jul 2022 10:03 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 4th Jul 2022 10:03 am
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Mon 4th Jul 2022 10:03 am
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 4th Jul 2022 10:03 am
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 4th Jul 2022 10:03 am
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Mon 4th Jul 2022 10:03 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Mon 4th Jul 2022 10:03 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 4th Jul 2022 10:03 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Mon 4th Jul 2022 10:03 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Mon 4th Jul 2022 10:03 am











