साखरवाडी ता. फलटण येथिल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र

फलटण :  फलटण तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जाणारी साखरवाडी ग्रामपंचायत चे पाच सदस्य जिल्हा अधिकारी सातारा यांनी त्यांच्या आपत्रे बाबत आदेश लागू केले आहेत. या बाबत सविस्तर माहिती अशी आहे की. साखरवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच श्री विक्रम सिंह भोसले यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दिनांक 9. 12. 2022. रोजी दाखल केला होता.

 या अर्जावर सातारा जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी झाली त्याचा निकाल दिनांक 29 .11 .2000 रोजी देण्यात आला, आणि विक्रम सिंह भोसले यांनी दाखल केलेले पाच अर्ज मंजूर करण्यात आले. सातारा जिल्हाधिकारी यांच्या या निर्णयामुळे विद्या विलास भोसले, मच्छिंद्र बापूराव भोसले, सुनंदा तुकाराम पवार, लक्ष्मी उर्फ मनीषा अंकुश माने, आणि गौरी देवी राजेंद्र माडकर, हे पाच ग्रामपंचायत सदस्य यांना ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून राहणे अपात्र करण्यात आले.

 माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांनी राजे गटास जोरदार धक्का देत राजे गटाचे हे पाच सदस्य अपात्र केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14,( ह) अन्वये मुदतीत ग्रामपंचायत कर मागणी भरणा न केल्याने जिल्हाधिकारी सातारा यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत विक्रमसिंह भोसले यांचे वतीने अँड. आप्पासाहेब नामदेव जगदाळे, व अँड. देवदत्त आप्पासाहेब जगदाळे यांनी युक्तिवाद केला होता

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त