वडी ता.खटाव येथे मद्यधुंद चालकाने केला भिषण अपघात.

खटाव  : वडी ता‌.खटाव येथे पुलाचे काम सुरू असलेने सुमारे १०० मिटरवर सलग डबल स्पीड ब्रेकर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनांची गती कमी होऊन अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होत असते.परंतू रात्रीच्या सुमारास आयशर कंपनीच्या प्रो १११० एच क्रमांक एम.एच.१२ पी.क्यू.३४८६ हा ट्रक स्पीड ब्रेकर वर असतानाच गोविंद डेअरी चे दुध व दुग्धजन्य पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या आयशर कंपनीच्या २०४९ बी क्रमांक एम.एच.११डी.डी.५३६४ च्या  मनोज मोहन गायकवाड या मद्यधुंद चालकाने मागच्या बाजूला जोरदार धडक दिली.या भिषण अपघातात क्लिनर बाजूस बसलेला डेअरी चा सुपरवायझर गंभीर जखमी झाला. त्यास पेट्रोलिंग करत असलेले औंध पोलीस स्टेशन गोपनीय चे अधिकारी पंकज भुजबळ आणि गृहरक्षक दलाचे जवान यांनी शिताफीने बाहेर काढून पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस वाहनातून औंध रूग्णालयात प्रथमीक उपचार करून पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये पाठविले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांनी तातडीने उपस्थित होऊन सदर घटनेची माहिती घेतली.

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त