जावळीत राज्य उत्पादन शुल्क अलर्ट मोडवर विभागाची धाड
37 जणांविरोधात गुन्हा दाखलSatara News Team
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
- बातमी शेयर करा
सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सध्या सातारा जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारु धंद्यावर धडक कारवाई केली जात आहे. विभागाच्या वतीने नुकतीच जावळी तालुक्यात कारवाई करत अनेकांना ताब्यातही घेतले होते. त्यानंतर आता येथील अवैध दारु धंद्यावर विभागाने धंदा टाकत एकूण ३७ जणांवर गुन्हा दाखल केले आहेत. या कारवाईत सुमारे अडीच लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत विभागाने हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील अवैध दारु विक्रेत्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. सातारा राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून दि. ३ आॅगस्ट रोजीही विक्रम उत्तम पवार (रा. कुडाळ), मुकेश शिवाजी नवले, सुधीर शंकर भिसे (रा. सायगाव) आणि बाबासाहेब दिनकर भिसे (रा. हुमगाव) यांच्या घरी तसेच दारु अड्यांवर धाडी टाकल्या. तसेच देशी, विदेशी दारु, बिअर असा मिळून सुमारे ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच संबंधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाने मागील सहा दिवसांत जावळी तालुक्यातच अवैध दारुचा पुरवठा करणारे आणि अवैध दारुधंद्यावर कारवाई करत ३७ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्या ताब्यातून दारु, बिअरचा एकूण २ लाख ५४ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या कारवाईत निरीक्षक श्रीकांत खरात, माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रतिक ढाले, सहायक दुय्यम निरीक्षक महेश मोहिते, अमोल खरात, जवान मनिष माने, अरुण जाधव, नरेंद्र कलकुटगी, किरण जंगम, आबासाहेब जानकर, महेश देवकर आदींनी सहभाग घेतला.
स्थानिक बातम्या
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 5th Aug 2023 12:29 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 5th Aug 2023 12:29 pm













