सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात नशेतील स्टंटबाजी आली अंगलट
स्टंटबाजी करणाऱ्या एजंट हुमायून तांबोळी, संतोष शिंदे, भोसले यांच्यावर ३५३, ३८०, ५००, ५०४, ५०६, ३३२, ३४ अन्वये गुन्हा दाखल
जुबेर शेख - Sun 13th Aug 2023 12:38 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयात थेट कर्मचाऱ्याला दारुच्या नशेत धमकी देत धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा केला. त्याचबरोबर अंतिम दस्ताऐवज असलेली कागदपत्रे चोरल्याचा एजंटगिरी करणाऱ्यांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात व्हिडिओ रेकॉर्ड करून नशेत केलेली स्टंटबाजी सोशल मीडियावर व्हाईलर करण्याचे प्रकरण अंगलट आले असून यात सहभागी असलेल्या सर्वांच्यावर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एका उचापतीखोर अधिकाऱ्याने मोकळेपणाने हात साफ करता येत नसल्याने काही एजंटांना हाताशी धरून नाना उचापत्या केल्या आहेत. यात थेट वरिष्ठांना बदनाम करण्याचा वारंवार प्रयत्न करत कार्यालयाच्या कामकाजाची माहिती अधिकार, काही फुटकळ राजकीय कार्यकर्त्यांचा वापर केला आहे. प्रत्येक प्रकरणामागे हाच उचापतीखोर अधिकारी असल्याचे समोर आले आहे. तसेच पुन्हा नवीन प्रकरण सोशल मीडियावरुन चव्हाट्यावर आले आहे.या कार्यालयातील मुख्य लेखापाल सतिश शिवणकर कामकाज करत असताना एजंटगिरी करणारा हुमायून तांबोळी याने मद्याच्या नशेत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ, खोटे आरोप, कागदपत्रे अंगावर फेकून वरिष्ठांना शिव्या, धमकी, धक्काबुक्की, कामकाज अडथळा निर्माण करत स्टंटबाजी केली. ही नियोजनबध्द स्टंटबाजी व्हिडिओ रेकॉर्ड करून त्यातील काटछाट करून सोशल मीडियावर व्हाईलर करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नाहक बदनामी केली आहे. या प्रकरणाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून हुमायून तांबोळी याने कार्यालयातील काही कागदपत्रे चोरल्याचे निदर्शनास आले असून याबाबत सतिश शिवणकर यांनी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात स्टंटबाजी करणारा हुमायून तांबोळी, त्याचा हस्तक एजंट संतोष शिंदे (पाटखळ), रेकॉर्डिंग करणारा भोसले, सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या अज्ञातांच्या विरोधात ३५३, ३८०, ५००, ५०४, ५०६, ३३२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
संबंधित बातम्या
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
-
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
-
पुसेगावमध्ये गॅस कटरने ATM मशीन फोडून ६ लाख ६१ हजारांची रोकड लंपास; सीसीटीव्हीचेही केले नुकसान
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
-
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Sun 13th Aug 2023 12:38 pm
-
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Sun 13th Aug 2023 12:38 pm










