स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
दोन बोलेरो, टाटा टेम्पोसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखलSatara News Team
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
- बातमी शेयर करा
वडूज : सातारा जिल्ह्यात बेकायदेशीररित्या स्फोटक पदार्थांची वाहतूक व साठा करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी कारवाई करत तब्बल 17 लाख 9 हजार 900 रुपयांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा व तीन वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष पथक तयार केले होते. 26 जून रोजी विश्वसनीय माहितीच्या आधारे मायणी–विटा मार्गावरील गरवारे वस्ती येथे दोन बोलेरो वाहनांमधून जिलेटिन व इतर स्फोटक पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडूज पोलिसांच्या मदतीने 27 जून रोजी मध्यरात्री सुमारे 12.10 वाजता छापा टाकला. संशयित वाहनांची झडती घेतली असता 'सुपर पॉवर 19 एक्स – डेंजर एक्स्प्लोसिव्ह' असे लिहिलेल्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळून आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDS) तसेच फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. बीडीएस पथकाने स्फोटकांची खात्री केल्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक स्फोटके बाहेर काढून परिसर सुरक्षित करण्यात आला.
कारवाईदरम्यान जिलेटिनच्या 1,800 कांड्या (9 बॉक्स), इलेक्ट्रिक, नॉन-इलेक्ट्रिक व ऑर्डिनरी डेटोनेटर्स, सेफ्टी फ्युज, दोन बोलेरो वाहने आणि टाटा कंपनीचा बंद टेम्पो असा एकूण 17,09,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेला स्फोटकसाठा सुरक्षिततेच्या दृष्टीने परवानाधारक मॅगझिनमध्ये ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी विशाल लक्ष्मण जाट (वय 39), बारुलाल लक्ष्मण जाट (दोघेही सध्या रा. मायणी, ता. खटाव, मूळ रा. राजस्थान) आणि शंकर बेनीराम चौधरी (रा. मायणी, ता. खटाव) यांच्याविरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियम 1884 व 1908 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 288 अन्वये वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस हवालदार अजित कर्णे, प्रवीण पवार, स्वप्निल दौंड, अमित सपकाळ तसेच वडूज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या केली. या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
शिंदे साहेब, जावळी-महाबळेश्वरची हाक ऐका!
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
“सात संचालक ‘ताब्यात’… तरी ठराव धुळीस! हुमगावात मानकुमरेंचा हल्लाबोल
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
संबंधित बातम्या
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 27th Jun 2026 06:29 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 27th Jun 2026 06:29 pm













