उदयनराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. 
शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी निधी देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. तसेच, प्रताप गड प्राधिककरण जाहिर करण्यात आलं आहे. तर या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
लंडनमधली भवानी तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत. असही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
शिवराज्याभिषेकाचं हे ३५०वं वर्षं असून यानिमित्ताने विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी राज्य सरकारकडून अर्थसंकल्पातच ३५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला