शार्वी घाडगेची इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये नोंद
सतीश जाधव
- Sun 13th Aug 2023 11:15 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : फत्त्यापूर ता.सातारा गावचे सुपूत्र व सध्या बंगलोर येथे नोकरी निमित्ताने स्थायीक असणारे सागर संपत घाडगे यांची कन्या शार्वी सागर घाडगे हिने इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये सहभाग घेऊन वयाच्या 1 वर्ष 7 महिने वय असणाऱ्या शार्वीने इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आपले नाव प्रस्थापित करून फत्यापूरसह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून अतिशय लहान वयात विविध फळभाज्या, फळे, विविध गेम, पक्षी, प्राणी, A to Z इग्रजी शब्द पाठांतर त्याचबरोबर देशपातळीवरील लीडर्स यांची नावे अगदी सहजरित्या सांगणार्या शार्वीने इंडिया बुक रेकॉर्ड मध्ये वयाच्या 1 वर्ष आणि 7 महिने हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले .
'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'च्या संपादकीय मंडळाने केलेल्या पुराव्याची बारकाईने पडताळणी आणि विसंगतींना वाव नसलेला बुक रेकॉर्ड डेटाबेस यांचा समावेश असलेल्या विस्तृत तपासणीनंतर रेकॉर्ड लेखनाचे प्रोटोकॉल प्रमाणे महाराष्ट्रातील सातारा येथील शार्वी सागर घाडगे (जन्म 22 नोव्हेंबर 2021 हिने 11 व्यंगचित्रे, 10 वाहने, 12 शरीर अवयव , 7 पक्षी , 11 भाज्या , 14 प्राणी , 8 खेळ , 7 नेते , 14 फळे , 7 क्रिया ,A to Z इंग्रजी शब्द तसेच एक कविता बोलत असल्याची पडताळणी करून इंडिया बुक आँफ रेकाँर्डस मध्ये गौरविण्यात आले असून तीच्या या यशाबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणारी आई प्रियांका सागर घाडगे हिचे मा.सरपंच संपत ह.घाडगे यांच्यासह सामाजिक,शैक्षणिक,कृषी,राजकीय क्षेत्रातून तसेच ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी,भैरवनाथ पाणी पुरवठा संस्था फत्यापूर यांनी अभिनंदन केले आहे

फोटो :-
इंडिया बुक आँफ रेकाँर्डसने गौरविण्यात आलेल्या मानांकनसह कु.शार्वी घाडगे
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Sun 13th Aug 2023 11:15 am
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 13th Aug 2023 11:15 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 13th Aug 2023 11:15 am
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Sun 13th Aug 2023 11:15 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Sun 13th Aug 2023 11:15 am
संबंधित बातम्या
-
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Sun 13th Aug 2023 11:15 am
-
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Sun 13th Aug 2023 11:15 am
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sun 13th Aug 2023 11:15 am
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 13th Aug 2023 11:15 am










