देगाव येथे बिबट्याचा धुमाकूळ

वाई : वाई तालुक्यातील देगाव या गावांमध्ये मुरा नावाच्या शिवारात गेल्या दहा दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे या बिबट्याने गावातील अनेक जनावरावर हल्ला करत त्यांचा जीव घेतला आहे गेल्या दहा दिवसात बिबट्याने गाय ,वासरू ,शेळी अशा नऊ  जनावरांवर हल्ला केला आहे त्यामुळे येथील  शेतकऱ्यांमध्ये चांगली दहशत पसरली आहे. गावकरी एकट्याने जनावर घेऊन जाण्यासही घाबरत आहेत मुरा नावाच्या शिवारात अनेक शेतकऱ्यांना त्याचे दर्शन झाले आहे जनावरानंतर आता हा माणसावर ही हल्ला करू शकतो या भीतीने  गावात दहशत पसरली आहे त्यामुळे शेतकरी मजूर शेती शिवारात जाण्यास घाबरत आहेत गुरे ढोरे चालणारे एक समूह बनवून एकाच जागी आपली जाणारे चारीत असल्याचे आढळून आले आहे या परिसरात बिबट्याचा डोंगराच्या पायथ्याशी मुक्त संचार वाढला आहे  बिबट्याने चरावयास गेलेल्या गाई, वासरू ,शेळी यांच्यावर हल्ला करून ठार केले आहे जवळपास दहा दिवसात बिबट्याने सहा ते सात जनावरे फस्त केले आहेत दरम्यान ग्रामस्थांनी शेतात जाताना घुंगराची काठी, कोयता सोबत घेऊनच जावे असे सूचना वन विभागाने दिले आहेत ‌‌. तसेच शेतकऱ्यांनी बिबट्या जेरबंद होईपर्यंत एकट्याने फिरणे टाळावे डोंगर परिसरात जायचे असल्यास समूहाने जावे अशा सूचना वन विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी बिबट्याच्या भीतीने देगाव गावातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे याप्रकरणी वनविभागाने तात्काळ कारवाई करून बिबट्याला बंदिस्त करावे अशी मागणी गावचे सरपंच सुरज पिसाळ तथा उपसरपंच प्रकाश इथापे यांनी केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला