येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मी तुमच्या सोबत : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
- Satara News Team
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
- बातमी शेयर करा
कराड : लोकसभेनंतर लगेचच चार महिन्यात निवडणुकांचे चित्र असे वेगळे दिसेल. यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. परंतु आपण लोकशाहीवर विश्वास ठेवून मिळालेला निकाल स्वीकारला परंतु राज्यातील वातावरण हे एकदरीत प्रक्रियेबाबत संशयाचे आहे. निवडणुकीत हार जीत ही होतेच. परंतु सरसकट राज्याचाच निकाल इतका एकतर्फी लागणे सर्वसामान्य मतदारांच्या मनात संशय निर्माण करणारे आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संशय दूर करण्याचे काम करणे अपेक्षित होते. विचार सोडून पळून जाण्याचे काम खरा कार्यकर्ता करत नाही. मला कराडच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. कराड दक्षिणच्या मातीचे उपकाराची परतफेड करण्याची मला संधी मिळाली. व या संधीतून तुमच्या सर्वांच्या एकत्रित बळावर कराडची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश आले. विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण लढलो. पुढील काळ कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे. त्या निवडणुकांना सामोरे जाण्याचा गंभीर विचार करणे गरजेचे आहे.
मी तुमच्या सोबत ठामपणे उभा आहे. चार महिन्यात अनेक घडामोडी होतील. राज्य सरकारची कृत्ये उघडकीस आल्यानंतर कदाचित लोकं विचार बदलतील. असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पाचवडेश्वर येथील आनंद मल्टीपर्पज हॉल मध्ये झालेल्या कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अजितराव पाटील - चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, युवा नेते इंद्रजित चव्हाण, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे, मलकपूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, गीतांजली थोरात, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख, माजी सदस्य नामदेव पाटील, राजेंद्र चव्हाण, मलकापूरचे माजी नगरसेवक प्रशांत चांदे, बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण, संजय तडाखे यांची प्रमुख उपस्थिती होती. ते म्हणाले, काँग्रेसने देशात लोकशाही आणली. भारतीय संविधानाचा लोकशाही हा आत्मा आहे. विधानसभेतील निवडणुकीनंतर लोकशाही जिवंत आहे का? हा सामान्य माणसाच्या मनात प्रश्न आहे. निवडणुकीचा निकाल धक्कादायक होता. लोकसभा निवडणुकीनंतर इतकी परिस्थिती बदलेल असे वाटत नाही. पारदर्शक, मुक्त वातावरणात निवडणुका होत नाहीत.
ईव्हीएम प्रक्रियेबाबत प्रत्येक नागरिकाला शंका आहे. काँग्रेसने पुढील निवडणुका मतदान प्रक्रियेने झाली पाहिजे, याकरिता देशव्यापी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. जर्मनीने या प्रक्रियेवर संविधानिक आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, सद्य परिस्थितीला आपल्याला सामोरे गेले पाहिजे. जिल्ह्याला यशवंतराव चव्हाण यांनी विचार दिला. तो विचार तात्पुरता लुप्त झाला आहे. कॉन्ट्रॅक्टर व त्यांचे एजंट यांचे राज्य आले आहे. काँग्रेस नेहमी संघर्षातून पुढे आली आहे. शासनाने याआधी पुकारलेल्या योजनांना अटी व शर्ती घातल्या आहेत. १४०० कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये जाहीर केलेल्या योजना कशा पुढे नेणार आहेत. याची चिंता वाटते. तोडा, झोडा नीतीला आपण सामोरे गेले पाहिजे. महात्मा फुले, छत्रपती शाहू व आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुढे आणण्याची गरज आहे. अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आम्हाला मान्य असून, हेच हिंदुत्व टिकवण्याची गरज आहे. महात्मा गांधींनाही हिंदुत्व मान्य होते. ते शेवटी 'हे राम' म्हणाले होते. या निवडणुकीचे सिंहावलोकन करून पुढे जाणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना, मोफत वीज, धार्मिक तेढ या बाजूवर महायुतीने काम केले.
ईव्हीएमबाबत सर्वत्र शंकास्पद वातावरण आहे. या परिस्थितीत संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही. कार्यकर्त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. सामान्य माणसापर्यंत पोहचले पाहिजे. नेता आणि कार्यकर्ता बरोबर चालला तर संघटनेला उभारी देवू शकतो. विलासराव पाटील - उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाण यांनी मतदारसंघातील मूलभूत सुविधा पूर्णत्वास नेल्या आहेत. कार्यकर्त्यांनी वैचारिक पातळीवर काम करत गाव पातळीवर आपली संघटना मजबूत करणे गरजेचे आहे.
प्रा. धनाजी काटकर म्हणाले, समाजाची अपेक्षा जाणून घेणे गरजेचे आहे. येणाऱ्या निवडणुका सक्षमपणे लढणे गरजेचे आहे. पृथ्वीराज बाबांनी एवढी विकासकामे केली आहेत कि पुढील किमान 10 वर्षे तरी कुणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही. स्वाभिमानाने प्रत्येकाने कार्य पुढे नेले पाहिजे.
भानुदास माळी म्हणाले, जिल्हा व गाव पातळीवरील संघटन भक्कम करणे गरजेचे आहे. प्रत्येक निवडणुकीत झोकून देवून प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हा परिषद गटानुसार कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विद्याताई थोरवडे यांनी आभार मानले.
#karad
स्थानिक बातम्या
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
ना.अमित शहा विरुद्ध निंदाजनक ठरावासह मुकधरणे आंदोलन संपन्न
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
पुसेगाव येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
बोरगाव पोलीसानी ट्रॅक्टरची लोखंडी फनपाळी चोरणारा चोरटा 24 तासांचे आत केला जेरबंद
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा होणार..., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
संबंधित बातम्या
-
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रविवारी जंगी स्वागत
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
-
उंब्रज येथुन जाणा-या राष्ट्रीय महामार्गावरील सध्याच्या भराव पुला ऐवजी भागनिहाय पारदर्शी पुल उभारावा,
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
-
माण चे आमदार जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री!
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
-
श्री प्रदीप झणझणे यांची फलटण भाजपामधून हकालपट्टी श्रीअमोल सस्ते
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
-
साखरवाडी ता. फलटण येथिल ग्रामपंचायतीचे पाच सदस्य अपात्र
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
-
रणजितसिंह निंबाळकरांकडून फलटण नगरपरिषदेचे अधिकारी धारेवर..सर्वच विभागांमध्ये भोंगळ कारभार !
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
-
जमिन आणि पाण्यावर उतरणारी व उड्डाण घेणारी सी प्लेनची सुविधा निर्माण करावी..श्री.छ.खा.उदयनराजे
- Thu 19th Dec 2024 02:47 pm
-
सातारा जिल्ह्यातून कोणाला लाल दिव्याची गाडी मिळणार ?
- Thu 19th Dec 2024 02:47 pm