दहिवडी फलटण रोडवर ट्रॅक्टर ट्रॉली बलेरोचा भीषण अपघात ; दोन जण जागीच ठार तर चार जखमी

आंधळी : दहिवडी फलटण रोडवर पांगरी  नजीक ट्रॅक्टर ट्रॉली व बलेरो गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले आहेत तर तीन जणांना पुढील उपचारासाठी सातारा या ठिकाणी नेण्यात आले आहे. ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर मोहन साहेबराव पांढरे रा. वावहिरे ता. माण याच्यावरती दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   सदर अपघातामध्ये बलेरो गाडीतील सपंत् केरू तामखडे वय 65 वर्ष, आर्या बाबुराव तामखडे वय ६ वर्ष यांच्या मृत्यूस झाला असून मालन संपत तामखडे,नीलम बाबुराव तामखडे, विद्या राहुल तामखडे व धनश्री, हिंदवी यांना किरकोळ व गंभीर दुखापत व वाहनाचे नुकसान झाले आहे. 
  याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सायंकाळी ७. वा. सुमारास बलेरो गाडी एम एच 11 बी एच १५ ३९ वरील चालक हा फलटण ते दहिवडी रोड दहिवडी बाजुकडे येत असताना मौजे पांगरी तालुका मान गावच्या हद्दीत बस स्टॉप पासून फलटण बाजूस 50 मीटर अंतरावर एक लाल रंगाचा बिगर नंबर प्लेटच्या मेसी फरगुशन कंपनीच्या ट्रॅक्टर वरील चालक मोहन साहेबराव पांढरे यांनी ट्रॉलीला रिप्लेक्टर न लावता ट्रॉलीमध्ये  लोखंडी पाईप भरून डांबरी रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभा केल्याने हा अपघात झाला आहे.. 
      याबाबत बिना नंबर प्लेट चा मिसी फरगुशन कंपनीचा ट्रॅक्टर वरील चालक मोहन साहेबराव पांढरे यांच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 134अ, 134 ब  प्रमाणे क गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास महिला पी.एस.आय मोटे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त