फलटण तालुक्यातील जिंती गावाच्या हद्दीत दुचाकीचा अपघात युवकाचा मृत्यू !

फलटण: फलटण तालुक्यातील जिंती गावाच्या हद्दीत दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी अंगावर पडल्याने प्रवीण प्रमोद भापकर वय ३५ रा लाटे तालुका बारामती या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली 

 याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेली अधिक माहिती अशी,दि ९ रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास जिंती फलटण रस्त्यावर प्रवीण प्रमोद भापकर हे दुचाकी क्रमांक एम एच ४२ ए बी २७९१ वरून जात असताना त्यांचा अपघात झाला अपघातात दुचाकी अंगावर पडून ते बेशुद्ध अवस्थेत पडले होते यावेळी घटनास्थळी फलटण ग्रामीणचे पोलीस दाखल झाले पोलीस व ग्रामस्थांनी प्रवीण भापकर यांना फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वीच मयत असल्याचे सांगितले याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त