शाळेमध्ये कबड्डी खेळताना पडल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू

सातारा :  शहरांमध्ये काल एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका शाळेमध्ये दहावी इयत्ता मध्ये शिकत असलेल्या मुलीचा खेळताना पडून मृत्यू झाला आहे 

 याबाबत शाहूपुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार कन्या शाळेत दहावी मध्ये शिकत असलेली अक्षदा देशमुख वय वर्ष 15 राहणार यादव गोपाळ पेठ या मुलीचा शाळेमध्ये कबड्डी खेळताना पडल्यामुळे डोक्याला मार लागल्याने सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान शुद्ध पडली होती. शाळेतील शिक्षकांनी तिला जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मानसी पाटील यांनी तिला मयत घोषित केले. या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये या घटणेची नोद झाली असून 161 / 2024 bns 194 प्रमाणे मृत्यूची नोंद झाली आहे.

 सदर मुलीचे पोस्टमार्टम केल्यानंतर डोक्यास जोराचा मार लागल्याने मृत्यू झाला चे डॉक्टरांचे मत आहे. अधिक तपास ए.पी.आय बाबर मॅडम करत आहेत.




याबाबत मात्र शालेय परिसरात तसेच पालकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून योग्य उपचार मिळाला असता तर मुलीचा जीव वाचला असता अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.अशी घटना आणखीन कोणत्या शाळेत घडू नये यामुळे शाळेमध्ये लावलेली सीसीटीव्ही तपासण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त