कराड मध्ये ट्रकने धडकेत दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकाच्या खाली सापडल्याने दुचाकीस्वार ठार

कराड : कराड ते विटा मार्गावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर एका अज्ञात ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून ट्रकचालक पसार झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भीमराव तुकाराम भोसले (औध. ता. खटाव जिल्हा सातारा) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

     याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, कराड ते विटा मार्गावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयासमोर कृष्णा नाका दिशेने एक दुचाकीस्वार ( क्रमांक एमएच ४२ एटी ७४३६) जात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून ट्रक क्रमांक (एमएच ११ ए जी १००८) मधून ट्रकचालक येत होता. यावेळी ट्रकचालकाने उपजिल्हा रुग्णालय समोरील सिग्नल क्रॉस केल्यानंतर समोरील दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त