धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला, मुलगा जखमी

उंडाळे : उंडाळे ता. कराड येथील उंडाळे शेवाळवाडी रस्त्यावर एका शाळेजवळ दुचाकीवरून निघालेल्या पिता पुत्रावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला. काल, रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत शेवाळे हे मुलगा प्रतीकला घेवून दुचाकीवरून उंडाळे येथे आठवडी बाजारासाठी आले होते. सायंकाळच्या सुमारास बाजार करून परत जात असताना शेतातून अचानकपणे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. 

हल्ल्यात पाठीमागे बसलेल्या प्रतीक गंभीर जखमी झाला. प्रसंगावधान राखत शेवाळे यांनी दुचाकी वेगाने पुढे नेत बिबट्याच्या तावडीतून बचाव केला. जखमी प्रतीकला तातडीने उंडाळे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर आहे. शेवाळे यांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. हल्ल्यामुळे पिता-पुत्र दोघेही घाबरले होते. परिसरातील नागरिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त