महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटवर उडी मारून व्यक्तीची आत्महत्या

महाबळेश्वर  महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटवर उडी मारून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला: ट्रेकर्स व रेस्क्यू टीमचा संघर्षपूर्ण मदत कार्य आज, १९ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाबळेश्वर ट्रेकर्स चे सदस्य सुनील बाबा भाटिया यांचा कॉल आला की, महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लॉडविक पॉईंट वर एका व्यक्तीने कड्यावरून उडी मारली आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.

 यानंतर, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम च्या सदस्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. टीमचे सदस्य ५५० फुट खोल दरीत उतरून मदत कार्यात सहभागी झाले. 

महाबळेश्वर ट्रेकर्स चे कुमार शिंदे, सोमनाथ वागदरे, अमित कोळी, सौरभ गोळे, जयवंत बिरामणे, अमित झाडे, सौरव सालेकर, सुजित कोळी, आतेश धनावडे, अनिल लांगी, सूर्यकांत शिंदे, सुजित कोळी, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, अक्षय नाविलकर, सचिन डोईफोडे आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे व आशिष बिरामणे यांचा सामील झाला. या अथक प्रयत्नांनंतर, दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला गेला. या धाडसी मदत कार्यामुळे ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमला त्यांचा उद्देश सफल करण्यात यश आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त