बिबट्याचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला,कराडच्या घोगावात 13 मेंढ्या जागीच ठार

 कराड :   कराड तालुक्यातील घोगाव येथील पाटीलमळी शिवारात मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून यामध्ये १३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. 

यात मेंढपाळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबात अधिक माहिती अशी की, शेतीसाठी खत व्हावे या उद्देश्याने कराड तालुक्यातील घोगावातील पाटील मळी शिवारात एका शेतकऱ्याने मेंढ्या बसवल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी बिबट्याने येऊन मेंढ्याच्या कळपावर अचानक हल्ला केला. यावेळी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एकूण मेंढ्यापैकी १३ मेंढ्या जागीच ठार झाल्या. दुसऱ्यादिवशी आज सकाळी शेतकऱ्याने मेंढ्या बसवलेल्या शेतात जाऊन पाहिले असता त्याला मेंढ्या मृत अवस्थेत पडलेल्या आढळून आल्या.

 त्यानंतर शेतकऱ्याने व ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळाल्यानंतर संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी नजाऊन पंचनामा केला. दरम्यान, घोगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त