आंघोळीसाठी गेलेला फरसाणा विक्रेता परप्रांतीय युवक नीरा नदीत बुडाला शोध कार्य सुरू

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील नीरा नदी पात्रात परप्रांतीय युवक बुडाला. सुरेंदर जोहरसिंग शिकरवार (वय 35, मुळ रा.आग्रा उत्तरप्रदेश, सध्या रा.संगमवाडी जि.पुणे) असे मृताचे नाव आहे. 

याबाबतची मिळालेली माहिती अशी की, शिरवळ येथील ग्रामदैवत श्री अंबिका माता यात्रेकरिता उत्तरप्रदेश येथील फरसाण विक्रीकरिता साधारणपणे २० ते २५ जण आले आहेत. दरम्यान, आज सोमवारी सकाळच्या सुमारास नीरा नदीच्या पात्रामध्ये अंघोळीसाठी संबंधित विक्रेते आले होते. यावेळी सुरेंदर नदीच्या पात्रात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. 

याबाबतची माहिती मिळताच तात्काळ शिरवळ पोलीस, रेस्क्यू टिमसह घटनास्थळी दाखल झाले. शोधमोहीमेत पाण्याच्या प्रवाहामुळे सुरेंदरचा मृतदेह शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गेल्या तीन दिवसांमध्ये तीन घटना घडल्या असून नायगाव याठिकाणी मावस आजोबा व नातू, शेखमिरवाडी याठिकाणी युवक तर आज परप्रांतीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. घटनेची नोंद पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत झाली नव्हती

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त