पाचवड मध्ये नाना पटोले यांचे तालुका काँग्रेस च्या वतीने स्वागत..!

वाई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय माजी मंत्री आ. नाना भाऊ पटोले हे कराड येथे होणाऱ्या संविधान बचाव यात्रेच्या समारोपास निघाले असताना वाई तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन लाभले. वाई तालुक्यात काँग्रेस पुन्हा पुनर्जीवित व्हावे यासंदर्भात बोलताना त्यांनी कार्यकर्ते यांचे प्रश्न जाणून घेतले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेस मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून काँग्रेस पुनर्जीवित होईल असे त्यांनी वाई तालुक्यातील कार्यकर्त्यांना सांगितले. यावेळी वाई तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विलास बापू पिसाळ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस व चांदवडी गावचे लोकनियुक्त सरपंच जयदीप दादा शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती  सुनील आप्पा बाबर, सेवादल अध्यक्ष काशिनाथ पिसाळ, माजी तालुका आध्यक्ष रवी भिलारे, लेखक-दिग्दर्शक तेजपाल वाघ,
सातारा जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष विहार पावसकर, वाई विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काटे,वाई शहर अध्यक्ष अजिंक्य देशमुख, प्रकाश शिंगटे, राजू पाटील, जीवन मोरे उडतरे व पाचवड ग्रामस्थ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला