वाई येथे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

वाई : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचालनालय व सातारा जिल्हा प्रशासन आयोजित महा सांस्कृतिक महोत्सव निमित्त कन्याशाळा वाई येथे इतिहास संशोधक भारत इतिहास संशोधक मंडळ व शिवकालीन शस्त्रांचे संग्राहक व इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांच्या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनाचा उद्घाटन वाईच्या नायब तहसिलदार श्रीमती वैशाली जायगुडे- घोरपडे यांचे हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाई पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नारायण घोलप, गट शिक्षण अधिकारी सुधीर महामुनी, वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती संजीवनी दळवी, वाई शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर, वाई कन्याशाळा चे व्हिजन न्यु इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापिका श्रीमती विद्या राव तसेच वाई नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी नारायण गोसावी व
स्थापत्य अभियंता श्रीमती कोमल साबळे, आरोग्य निरीक्षक सागर सरतापे, सभा अधिक्षक राजाराम जाधव, लेखापाल अक्षय गुरव, कर व प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब कांबळे, मनोज बारटक्के, अभियंता नितीन जाधव, राहुल शेंडगे, सर्वेश खाडे, अमोल पवार, महेश सावळकर, प्रकल्प अधिकारी श्रीमती जयश्री भोईटे,नगरपरिषद अधिकारी जितेंद्र वंजारी, नविन कांबळे, योगेश गाडे, वत्सला केदारी, शुभांगी हिरवे, प्रतिभा लाड व इतर अधिकारी व कर्मचारी आज उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त साता-या जिल्हयामध्ये दिनांक ०८ ते १० फेब्रुवारी २०२४ दरम्यान विविध सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणेत आलेले आहे. त्यानिमित्ताने आज शिवकालीन
शस्त्रांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व इतिहास अभ्यासक यांना इतिहास अभ्यासाची संधी निर्माण व्हावी म्हणून शस्त्रांचे प्रदर्शन कन्याशाळा वाई येथे आयोजीत केलेले आहे. वाई शहरातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालय यांनी या प्रदर्शणाचा लाभ घ्यावा. तसेच वाई शहरातील नागरीकांना सुध्दा हे प्रदर्शन पहाणेसाठी खुले आहे. इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर हे प्रदर्शन पहाणा-या विद्यार्थी व नागरीकांना शस्त्रांबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. तरी सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. सदर
उद्घाटन समारंभास वाई शहरातील नगरपालिका शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक तसेच वाई शहरातील नागरीक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थितीत होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

 औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला