बुधवार 3 ऑगस्ट आज काय आहे आपल्या राशीत पहा खालील लिंकचा वापर करुन
Satara News Team
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
- बातमी शेयर करा
बुधवार, ०३ ऑगस्ट २०२२ {आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }
बुधवार 3 ऑगस्ट आज काय आहे आपल्या राशीत पहा
मेष
आज काहीशी शारीरिक, मानसिक अस्थिरता जाणवेल. नको त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे प्रकर्षाने टाळा. कोणावरही विसंबून न राहता आपली कामे आपणच करण्याचा प्रयत्न करावा.
वृषभ
आजचा दिवस आपणासाठी उत्तम असणार आहे. त्यामुळे आजच्या सुंदर दिवसाचे योग्य पद्धतीने नियोजन करा व त्यानुसार अंमलबजावणी करत योग्य कृती करा. आज आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त कराल.
मिथुन
बऱ्याच दिवसांपासून घरातील काही रेंगाळलेली, रखडलेली, अडकलेली कामे आजच्या दिवशी पूर्ण कराल. घरच्या मंडळींचे त्यात सहकार्य लाभेल. आजचा दिवस आपल्या मर्जीने, मनसोक्त व्यतीत कराल.
कर्क
आपली काही स्वप्ने, इच्छा पूर्ण करण्यासाठी आज प्रयत्नशील राहाल. त्या दृष्टीने काही महत्त्वाची पावले देखील उचलाल. त्यात भावंडं, मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभेल.
सिंह
आजचा दिवस कुटुंबीयांमध्ये रममाण होण्याचा आहे. परिवाराच्या आनंदातच आज आपले सुख शोधण्याचा प्रयत्न कराल. त्यांच्या इच्छा – आकांक्षांचा आदर कराल.
कन्या
आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय उत्तम असेल. एक सकारात्मक ऊर्जा, उत्साह यांचा आपण आजच्या दिवशी अनुभव घ्याल. अपेक्षेपेक्षा जास्त सुखांची प्राप्ती आज संभवते.
तुळ
आजचा दिवस आपणासाठी काहीसा त्रासदायक, कष्टप्रद जाऊ शकतो. विनाकारण वाद विवाद कटकटी यासारखे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. खर्चावर नियंत्रण आवश्यक असेल.
वृश्चिक
आजचा दिवस आपणासाठी सुंदर असेल. बऱ्याच दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीची शुभ फळे आज प्राप्त होतील. आज प्रिय व्यक्तींचे प्रेम व सहवास लाभेल.
धनु
आजचा आपला दिवस कर्म प्रधान, कर्तव्य प्रधान असेल. कामाच्या व्यापामुळे काहीशी धावपळ, दगदग जाणवेल. आपण घेत असलेली मेहनत, परिश्रम, कष्ट व संघर्ष यातूनच यशाचा मार्ग सापडेल.
मकर
आज बऱ्याच दिवसानंतर काही मनाजोगत्या घटना घडतील. काही इच्छा, अपेक्षांची पूर्तता आज संभवते. आजच्या दिवशी आपण आपल्या सुखात, आनंदात इतरांनाही सामावून घ्याल.
कुंभ
आजचा दिवस काहीसा खडतर जाऊ शकतो. काही अप्रिय व्यक्ती, कटू प्रसंग यांना सामोरे जाऊ लागू शकते. मात्र संयम बाळगून, स्थिर बुद्धीने, खंबीरपणे आजचा दिवस व्यतीत करावा.
मीन
आजच्या दिवशी सुखाची, प्रेमाची, आनंदाची अनुभूती घ्याल. जोडीदाराचा मनाजोगता सहवास लाभेल. जोडीदाराला खूश ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्या आवडीनिवडींचा आदर करा.
Astrologer
कांचन स.थिटे.
कोरेगाव तडवळे रोड, नवीन S.T. स्टँड,
Mob ,:9657836393
Rashibhavish#राशीभविष्य
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Tue 2nd Aug 2022 07:40 pm













