वर्धन अँग्रो चे रोलर पूजन मोठया उत्साहात संपन्न

Vardhan Angro's Roller Pujan concluded with great enthusiasm
तसेच कारखाना अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यासाठी घेतलेल्या कष्टा साठी मानावे तेवढे धन्यवाद थोडे असून, अडचणी काळात जे आमच्या बरोबर राहिले त्यांचा सुवर्णकाळ आता चालू झाला असून वर्धन अँग्रो चा कर्मचारी म्हणून निश्चित सगळ्यांची मान उंचावेल अस काम येणाऱ्या काळात करून दाखवू

वर्धन अँग्रो साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सन २०२२-२३ चा मिल रोलर पूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे जेष्ठ संचालक भिमराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी बोलताना भिमराव पाटील म्हणाले की वर्धन कारखान्याचा ६ वा गळीत हंगामाची सुरवात रोलर पूजन करून  करण्यात येत आहे. गेल्या ६ वर्षात कारखान्याने बरेच चढ उतार पाहिले, अनेक अडचणींचे प्रसंग आले परंतु धैर्यशील दादांच्या मार्गदर्शना खाली विक्रम बाबा व सत्वशील बापू यांच्या काटेकोर केलेल्या नियोजना मुळे आज कारखाना कमी वेळात लोकांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे. आज शेतकऱ्यांमधे कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी गावा गावात चढाओढ असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे होत असताना अधिकारी व कर्मचारी यांची सुद्धा चांगली साथ मिळत असून निश्चित कारखाना संलग्नित सगळ्या घटकांना योग्य न्याय देण्याचे काम कारखाना करेल. यावेळी बोलताना विक्रमशिल कदम म्हणाले की, हा कारखाना हे  आपल्या सगळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज धैर्यशील दादांच्या गतिशील नेतृत्वाखाली सत्यामध्ये  उतरताना कारखान्याच्या प्रत्येक घटकाला समाधान वाटते. ६ व्या गळीत हंगामाची सुरवात म्हणजे रोलर पूजन कार्यक्रम असून इंजिनिरिंग विभागाला दिलेल्या वेळेत मेंटेनन्स ची कामे पूर्ण होत आहेत. गत वर्षी प्रमाणे याही वर्षी कारखाना ९ सप्टेंबर ला चालू होणार असून पहिल्या दिवसापासून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी ची ऊस तोडणी यंत्रणा भरली आहे. गत वर्षीच्या तुलनेत ४.५० लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे. त्यासाठी आवश्यक  सर्व ती मेंटेनन्स कामे वेळेत पूर्ण होतील व गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने पार पडण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तसेच कारखाना अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यासाठी घेतलेल्या कष्टा साठी मानावे तेवढे धन्यवाद थोडे असून, अडचणी काळात जे आमच्या बरोबर राहिले त्यांचा सुवर्णकाळ आता चालू झाला असून वर्धन अँग्रो चा कर्मचारी म्हणून निश्चित सगळ्यांची मान उंचावेल अस काम येणाऱ्या काळात करून दाखवू.यावेळी संचालक पृथ्वीराज निकम, संतोष घाडगे, अविनाश साळुंखे, रहिमतपूर नगरपालिका विरोध पक्ष नेते निलेश माने, पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब निकम,चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ,शेती अधिकारी सूर्यकांत पाटील, सिव्हिल इंजिनिअर सुधीर कदम तसेच विविध गावातील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आभार लेबर ऑफिसर रणजित चव्हाण यांनी मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला