लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या आर्चरी खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सातारा : शालेय विभागीय आर्चरी स्पर्धा कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या 7 खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. साहिल शेलार, शर्विल निकम, प्रणव मालवेकर, अखिलेश शेडगे या खेळाडूंची रिकर्व्ह खेळ प्रकारातून. प्रांजल वाईकर या खेळाडूची कंपाऊंड खेळ प्रकारातून तर वरद चोरगे व स्वर रंगोळे यांची इंडीयन खेळ प्रकारातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेजवळ सरांनी खेळाडूंचे या अतुलनीय कामगिरी बद्दल अभिनंदन केले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक विनायक भोई सर यांचे मार्गदर्शन लाभले तर श्री प्रविण सावंत सर, श्री शिवशंकर चोरट सर, यांचे खेळाडूंना प्रशिक्षण मिळाले. महाविद्यालयातील सर्वांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला