गोडोली तलावाच्या सुशोभिकरणाला हिरवा कंदिल
Satara News Team
- Fri 4th Nov 2022 11:32 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील गोडोली तळ्याच्या विकासाकरीता, केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा असलेल्या अमृत २.० या योजनेमधुन सादर करण्यात आलेल्या ४ कोटी ८३ लाखांच्या गोडोली सरोवर पुनरुज्जीवन प्रस्तावास राज्यशासनाच्या नगरविकास विभागाची प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. या मंजूरीबरोबरच केंद्राचा आणि राज्याच्या निधीपैकी पहिला हप्ता सुमारे २ कोटी रुपये मिळणार आहेत. आजच प्राप्त झालेल्या प्रशासकीय मंजूरीनंतर सुमारे ४५ दिवसांत निविदा प्रक्रीया पूर्ण करुन, गोडोली तळ्याच्या पुनरुज्जीवनाच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.
सातारानगरी ही ऐतिहासिक नगरी आहे. येथील ऐतिहासिक संदर्भ जपण्याबरोबरच झपाट्याने सर्वांगिन विकास साकारण्या साठी चांगले प्रकल्प आम्ही वेळोवेळी प्रस्तावित केलेले आहेत. प्रकल्प प्रस्तावित करताना,जास्तीत जास्त शासकीय निधी विनीयोगात आणुन, सातारकरांना सुविधा देण्याचा आमचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. याच उद्देशामधून सातारा येथील गोडोली सरोवराचे सुशोभिकरणाचा प्रस्ताव केंद्रशासनाच्या अमृत २.० या योजनेमधून प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ४ कोटी ८३ लाख इतकी आहे. यापैकी केंद्राचा ३३.३३ टक्के हिस्सा म्हणजेच १ कोटी ६१ लाख, राज्य शासनाचा ५१.६७ टक्के म्हणजेच रुपये २ कोटी ५० लाख आणि सातारा नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा १५ टक्के म्हणजेच रुपये ७२ लाख इतका असणार
आहे. ४ कोटी ८३ लाखाच्या प्रकल्प प्रस्तावास प्रशासकीय मंजूरी मिळाल्याने, या मंजूरी बरोबरच राज्य व केंद्राचा
पहिला हप्ता सुमारे २ कोटी इतका नगरपरिषदेला प्राप्त होणार आहे. या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून सातारा
नगरपरिषद आहे.
गोडोली सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प एकूण तीन भागात पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या भागात कंपौन्डवॉल डिझाईन, गोल बैठक, फ्लॉवर बेड व पॅसेज, गार्डन, लॅन्डस्केप पिचिंग आणि खेळणी बसविणे यांची कामेकरण्यात येणार आहेत. सदर कामाकरीता सुमारे ०१ कोटी २९ लाख अपेक्षित खर्च आहे. दुसऱ्या भागात डेक (सरोवराची सजावट), भरभक्कमपणा आणि रिटेनिंगची कामे केली जाणार आहेत. याकरिता रुपये ०१ कोटी ५३ लाखांची तरतुद करण्यात आली आहे. तिसऱ्या भागात डिसेटलिंग ऑफ वॉटर बॉडी (सरोवरातील पाण्याचे
निर्जतुकीकरण), कारंजे उभारणे इत्यादी ०१ कोटी ११ लाख रुपये खर्च होणार आहे. उर्वरित खर्च हा जीएसटी व नियंत्रण खर्च होणार आहे. यापूर्वी गोडोली तळ्याचा सामाजिकपुढाकारा तून विकास करण्यात आला आहे. आता अमृत २.० मधून
नियोजनबद्ध प्रकल्प राबविणेत येणार आहे. गोडोली सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे गोडोली परिसराचा अमुलाग्रबदल घडण्याबरोबरच एक आल्हाददायी आणि प्रेक्षणिय ठिकाण सातारवासियांना उपलब्ध होणार असल्याने,याचे मनस्वी समाधान आहे, असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 4th Nov 2022 11:32 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 4th Nov 2022 11:32 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 4th Nov 2022 11:32 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 4th Nov 2022 11:32 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 4th Nov 2022 11:32 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 4th Nov 2022 11:32 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 4th Nov 2022 11:32 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 4th Nov 2022 11:32 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 4th Nov 2022 11:32 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 4th Nov 2022 11:32 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 4th Nov 2022 11:32 am
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Fri 4th Nov 2022 11:32 am
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Fri 4th Nov 2022 11:32 am











