आ.जयकुमार गोरेंनी केले खा.उदयनराजेंचे अभिनंदन
धीरेनकुमार भोसले
- Thu 6th Jun 2024 11:08 am
- बातमी शेयर करा
दहिवडी : राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेला व 2024 च्या लोकसभेला सर्वात जास्त घडामोडी घडलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रणांगणात होते.
या अटीतटीच्या सामन्यात अखेर महायुतीचे उमेदवार खा.उदयनराजे भोसले यांनी विजयश्री खेचून आणत विरोधकांना आस्मान दाखवले. सुरुवातीच्या काळापासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष दस्तरखुद्द शरद पवारांसह राष्ट्रावादीतील प्रमुख नेतेमंडळींनी सातारा लोकसभेत पाय रोवले होते. त्यांनी सर्वात जास्त लक्ष सातारा लोकसभेवर दिल्याचे सातारकरांचा पाहिले आहे.
उदयनराजे भोसले खासदार झाल्यानंतर त्यांचे जिवलग मित्र माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, माण खटाव विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, निलेश माने यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त खासदार यांचे अभिनंदन केले आहे.
#UdayanrajeBhosale
स्थानिक बातम्या
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Thu 6th Jun 2024 11:08 am
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Thu 6th Jun 2024 11:08 am
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Thu 6th Jun 2024 11:08 am
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 6th Jun 2024 11:08 am
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 6th Jun 2024 11:08 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 6th Jun 2024 11:08 am
संबंधित बातम्या
-
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 6th Jun 2024 11:08 am
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 6th Jun 2024 11:08 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Thu 6th Jun 2024 11:08 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 6th Jun 2024 11:08 am












