चारचाकी गाडी चोरुन बनावट आर. सी. च्या सहाय्याने गाडी विक्रीकरुन गंडा घालणा-या टोळीचा पर्दाफाश
Satara News Team
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
- बातमी शेयर करा
कराड :कराड शहर पोलीस ठाणेस स्वीट गाडीची चोरी करुन तीचे बनावट आर. सी. बुक बनवुन गाडीची विक्री केलेबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील आरोपी हे कोल्हापुर व कराड मधील असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे यांना त्यांचे गोपनिय बातमीदार मार्फत प्राप्त झाली होती. सदर माहितीच्या आधारे मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बागंर सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने चारचाकी गाडी चोरुन सदर गाडीचे बनावट आर. सी. च्या सहाय्याने गाडी विक्रीकरुन गंडा घालणा-या टोळीचा तांत्रिक पध्दतीने तपास करुन पर्दाफाश केला आहे. आरोपीचा शोध घेणेकामी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक कोल्हापुर व दुसरे पथक कराड तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीत रवाना झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे रात्री उशिरा आरोपीना कोल्हापुर व बेलवडे हवेली ता. कराड मधुन ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी कडुन एक मारुती सुझुकीची स्वीफट आणि टोयोटा कंपनीची इनोव्हा क्रिस्टा अशा एकुन 20,00,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे अधिक तपास करता नमुद आरोपीवर गाडीची चोरी करुन तीचे बनावट आर. सी. बुक बनवुन गाडीची विक्री केलेबाबत इतर पोलीस ठाणेस देखील गुन्हे नोंद असल्याचे निष्पन झाले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक बापु बागंर सो. सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विभुते, पोलीस उप निरिक्षक आर.एल.डांगे, सफौ देसाई, पोलीस नाईक संतोष पाडळे, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संपोष लोहार, सोनाली पिसाळ, यांनी केलेली आहे.
स्थानिक बातम्या
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 2nd Aug 2023 04:01 pm













