सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवउद्योजकांस मदतीचा हात !

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उडतारे तालुका वाई शाखेचे ग्राहक सौ. प्रियंका ऋषिकेश गायकवाड, ऋषिकेश शिवाजी गायकवाड व शिवाजी रामचंद्र गायकवाड यांना आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बँकेच्या कंपोझिट नं. ३ या कर्ज योजनेतून व्यवसाय उभारणीसाठी रक्कम रु. १५ लाख कर्ज मंजूर करणेत आले आहे. बँकेचे अध्यक्ष मा. श्री. नितिन पाटील यांचे हस्ते उपाध्यक्ष मा. श्री. अनिल देसाई, संचालक श्री. दत्तानाना ढमाळ, श्री. राजेंद्र राजपुरे, श्री. रामराव लेंभे, श्री. सुरेश सावंत, श्री. लहुराज जाधव, संचालिका सौ. ऋतुजा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे यांचे प्रमुख उपस्थित मंजुरी पत्र देणेत आले. 
 या प्रसंगी श्री. नितिन पाटील म्हणाले, सातारा जिल्हा बँक हि नेहमीच जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांचेमार्फत मराठा समाजातील नवउद्योजकांना व्यवसायामध्ये स्थिर स्थावर होणेसाठी सातारा जिल्हा बँकेच्या माध्यमातून बँकेच्या कंपोझिट लोन नं. ३ या योजनेतून विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जात असून या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याज सवलतीचा लाभ घेणेचे आवाहन केले.
     यावेळी श्री. अनिल देसाई म्हणाले, जिल्हयातील ऊस क्षेत्र, स्ट्रॉबेरी सारखे फळबाग क्षेत्र व अन्य शेती उत्पादनावर उभारले जाणारे प्रक्रिया उदयोग तसेच पर्यटन उदयोग केंद्र व राज्य सरकारचे अनुदानीत व्यवसाय व शासन पुरस्कृत विविध जाती जमातीसाठीची महामंडळे यांचे मार्फत जिल्हयातील शेतकरी व उदयोजक व्यवसायिक यांच्या बैंक सदैव पाठीशी राहून कार्यरत आहे. जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतक-यांना शेती व शेतीपूरक कारणासाठी विविध प्रकारचा कर्जपुरवठा अल्पव्याज दराने करते .
या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक हि ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्हयामध्ये ३२० शाखा व ६२ एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या सेवा देत आहे. कळंबे या ग्रामीण भागातील बी. ई. मॅकेनिकल तरुणास व कुटुंबियास त्याच्या कृष्णा एंटरप्रायजेस अॅण्ड प्लस्टिक मोडयुलिंग या नवीन व्यवसायासाठी रु.१५.०० लाखाचे अर्थसहाय्य केले आहे. श्री. गायकवाड या व्यवसायातून विविध देव देवतांच्या व इतर आकर्षक मूर्ती तयार करतात. एक नविन व वेगळ्या प्रकारचा उद्योग जिल्हयात उभा रहात असताना, त्यास शासन पुरस्कृत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसह बँकेचे पुरोगामी विचारांचे मा. संचालक मंडळ व वरिष्ठ व्यवस्थापन यांनी बँकेच्या व्यक्तीगत थेट कर्जाअंतर्गत त्यांचे कर्जास मंजूरी देवून जिल्हयातील नव उद्योजकांना व वैशिष्टपूर्ण व्यवसायास उभे करण्याच काम सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून होत आहे. या उपक्रमाबद्दल बँकेचे मार्गदर्शक संचालक मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, मा. आ. श्री. बाळासाहेब पाटील, मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आ. श्री. मकरंद पाटील, यांनी श्री. ऋषिकेश शिवाजी गायकवाड यांना शुभेच्छा देवून शाखा अंतर्गत कार्यक्षेत्रातील  नवउद्योजक, शेतकरी, व्यावसायिक, पगारदार सभासदांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मिळणाऱ्या व्याज सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. 
श्री. ऋषिकेश गायकवाड यांनी जिल्हा बँकेने कमी कागद पत्रात कमीत कमी वेळेत कर्ज उपलब्ध करून दिलेबद्दल बँकेचे आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला