पुसेगाव ग्रामपंचायतीत संगनमताने लाखोंचा भ्रष्टाचार, सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांवर आरोप ग्रामस्थ विशाल जाधव यांची तक्रार

पुसेगाव : पुसेगाव ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सरपंच विजय मसणे व ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे यांनी संगनमत करून अंगणवाडी साहित्य खरेदी मध्ये सुमारे ७ ते ८ लाखांचा भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून दोघांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदार ग्रामस्थ विशाल दिनकर जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

विशाल जाधव यांनी दिलेल्या निवेदनात व प्रसिद्धीस दलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुसेगाव ग्रामपंचायतीने सन २०२०-२१, २१-२२ व २२- २३ या आर्थिक वर्षामध्ये शिक्षण विभागाच्या हेड मधून १२ अंगणवाडी व २ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी जीईएम पोर्टलवरून सनशाईन एंटरप्राईजेस प्रा. लि. कराड यांच्याकडून ११ लाख ४५ हजारांची शैक्षणिक साहित्यांची खरेदी केली.

ग्रामपंचायतीकडून अंगणवाडी व शाळांना जीईएम पोर्टलनुसार खरेदी केलेले शैक्षणिक साहित्य मिळाले आहे का? याची प्रत्यक्षदर्शनी पाहणी व लेखी माहिती घेतली असता. तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करून ११ लाख ४५ हजारांच्या खरेदी केलेल्या साहित्यापैकी साधारणपणे २.५ ते ३ लाखांचे साहित्यच प्रत्यक्षात शाळांना दिले आहे. तेही अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे आहे. 

ग्रामपंचायतीकडून १२ अंगणवाडी व २ शाळांना  कोणते - कोणते साहित्य मिळाले आहे याची प्रत्यक्षदर्शी पाहणी करून फोटो व व्हिडिओ काढले आहेत. साहित्याबाबतचे सर्व शाळांकडून लेखी तपशील घेतले आहेत. अशी वस्तुस्थिती असताना ग्रामपंचायतीने संबंधित एजन्सीचे १०० टक्के बिल सुद्धा चेकद्वारे अदा केले आहे. या प्रकरणाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करून तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी व सनशाईन एंटरप्राईजेस प्रा. लि. कराड यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे निवेदनात नमूद केले आहे.

विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित
विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण व चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी निधी दिला जातो. मात्र पुसेगाव ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच विजय मसणे व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्यामध्ये भ्रष्टाचार केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे तक्रारदार ग्रामस्थ विशाल जाधव यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला