खा. छ. उदयनराजे-शिवेंद्रराजे समर्थकांमध्ये हाणामारी.... नगरपालिकेची चाहूल ?

सातारा ;  विधानसभा निवडणुकीदिवशी शेवटच्या एका तासात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. प्रतापसिह नगर तसेच बापूसाहेब चिपळूणकर मतदान केंद्रावर हे हाणामारीचे प्रकार समोर आले. खा. छ. उदयनराजे आणि छ.शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटात झालेल्या हाणामारीत माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्यासह चौघे जखमी झाले. 

 साताऱ्यातील बापूसाहेब चिपळूणकर मतदान केंद्रावरील मतदान संपल्यानंतर खा. उदयनराजे समर्थक माजी नगरसेवक वसंत लेवे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थक संजय लेवे यांच्या गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. वसंत लेवे यांच्या डोक्यात रॉड घातला. या हाणामारीत वसंत लेवेंसह एकूण पाच जण जखमी झाले. या राड्यानंतर साताऱ्यात तणाव निर्माण झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


 वसंत लेवे आणि संजय लेवे यांच्या गटात मारामारी झाल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले होते. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात पाठवले. तक्रार घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले. परंतु, आम्हाला आत्ता तक्रार द्यायची नाही, असे त्यांनी सांगितले. 

त्यांनी तक्रार दिली नाही तरी पोलीस स्वत: फिर्याद देतील आणि संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया शाहूपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी दिली आहे.


 लोकसभा संपली विधानसभा संपली आता नगरपालिका आणि दोन्ही राजे एकत्र झाल्याने दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये समभ्र निर्माण झाला आहे.  त्यामुळे कालची ही भांडणे नगरपालिकेची तयारी म्हणायचं का ? असा सवाल बऱ्याच लोकांच्या मनात उपस्थित झाला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त