लहान मुलाच्या खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप
Satara News Team
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
- बातमी शेयर करा
ऍड.विकास पाटील शिरगांवकर 302 च्या खटल्यात विशेष सरकारी वकील व क्रास केस मध्ये 326 च्या खटल्यात बचाव पक्षाचे वकील दोन्ही खटल्याचा निकाल ?ड विकास पाटील -शिरगांवकर यांचे बाजूने झाला आहे. असा दुर्मिळ निकाल पाहायला मिळाला आहे
सातारा : ऋषीकेश आबा निकम या लहान मुलाचे खून प्रकरणी मोक्का खटलातील आरोपी रविंद्र गोरखनाथ निकम यास आजन्म जन्मठेप
जांब ता. कोरेगाव या गावातील पुर्वीच्या वादातून झालेल्या भांडणातून ऋषीकेश या मुलावर तलवारीने वार झाले होते. त्यांचा उपचारपुर्वीच मृत्यू झाला. यामुळे रविंद्र निकम यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल होवून मा. न्यायालयात खटला सुरू होता. या खटल्याचा निकाल लागला असून आरोपी रविंद्र याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
जांब ता.कोरेगांव या गावी दि 5/9/2014 रोजी सायं 6.00 वा आबा जयसिंग निकम यांचा मुलगा व त्याचे चुलते जितेंद्र जयसिंग निकम हे आरोपी रविंद्र निकम याचे घरी त्यांच्या मध्ये असलेला पुर्वीचा वाद, भांडण मिटविण्यासाठी तंटा मुक्ती समितीपुढे यावे हा निरोप देण्यास गेले असता, आरोपी रविंद्र याने त्याचे घरातील लोकांबरोबर ऋषीकेश तलवारीने पोटात वार केला सदर हल्ल्यामघ्ये सोहील निकम व सचिन निकम यांची ही हात होता पण त्यांना संशयाचा फायदा देण्यात आला.
सदर हल्ला झालेनंतर प्रत्यक्ष घटना पाहणारे जितेंद्र जयसिंग निकम, निलेश निकम, राकेश शिखरे, मयुर डांगे यांनी त्यास सातारा हास्पिटल मध्ये उपचारासाठी आणले तथापी तो मयत झाला. सदरचा खुनाचा प्रकार विचारात घेऊन सदर खुनास बचाव व्हावा म्हणून आरोपी रविंद्र याने कोरेगांव पोलीस स्टेशन मध्ये जितेंद्र जयसिंग निकम व सर्व प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार यांचे विरूध्द कोरेगांव पो.ठाणे येथे भा.दं.वि. कलम 326 ची खोटी तक्रार दिली
सदर खून प्रकरणी ऍड विकास बा. पाटील- शिरगांवकर यांनी हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहीले, सदर कामी 10 साक्षीदार, प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार,यांचा पुरावा व शाबीत केलेला वैद्यकीय पुरावा,परिस्थिती जन्य पुरावा,पंचनामा,याचा विचार करून, मोक्का खटलातील आरोपी रविंद्र गोरख नाथ निकम यांस ऋषीकेश चा खून केली म्हणून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.
ऍड विकास पाटील शिरगांवकर यांनी सत्र खटला क्र. 20/2016 मध्ये आरोपी जितेंद्र जयसिंग निकम, निलेश निकम, राजेंद्र निकम,राकेश शिखरे यांचा बचाव करून त्यांना 326 च्या खटल्यात निर्दोष मुक्त केले. सदर कामी ऍड शिरगांवकर यांनी 7 साक्षीदारांचा घेतलेला उलटत पास हा सदरची फिर्याद ही कशी खोटी आहे, पंचनामे हे कसे बनावट आहेत आहेत, व सदरच्या पंचनाम्यावर सही असलेले साक्षीदार यांचे कडून त्यांनी ते पंचनाम्यास हजर नव्हते हे उत्तरे न्यायालयासमोर आणले, सदरच फिर्याद ही खोटी कशी ठरत आहे, जखमी साक्षीदारांच्या जखमा ह्या तलवारीच्या नाहीत असे वैद्यकिय अधिकारी यांचेकडून मिळविलेली उत्तरे, तपास हा तपासी अधिकारी श्री डी जी बागवे यांनी केलेला तपास कसा चुकीचा आहे. हे न्यायालयासमोर आणले व ऋषीकेश निकम चा खून कोणी केला हे समोर आणले. खूनाच्या गुन्हयाचा तपास हा निवृत्त अधिकारी श्री प्रकाश गणपत धस यांनी केला.
सदरचे प्रकरण हे सन 2019 मध्ये सुरू झाले पण कोरोना च्या काळात काम चालले नाही. सन 2021 मध्ये हे प्रकरण सुरू झाले. ऍड विकास पाटील-शिरगांवकर यांनी खुन प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहून आरोपी रविंद्र गोरखनाथ निकम यांस आजन्म कारावासाची शिक्षा घेतली त्याच बरोबर 323 च्या काउंटर केस मध्ये सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. दि 5/9/2014 रोजीच्या गुह्या मध्ये घटना, घटना स्थळ पंचनामा हा एकच,घटना पाहणारे प्रत्यक्ष दर्शी हे एकमेकांचे विरूध्द साक्षीदार व आरोपी यापैकी खरा आरोपी कोण व खोटी फिर्याद देणारा कोण हे सिध्द करणे म्हणजे एक प्रकारचे शिव धनुष्य, ऍड. विकास पाटील -शिरगांवकर यांनी उचलले व खूनाच्या खऱया आरोपीस आजन्म कारावास घेतला पण त्याच बरोबर 326 च्या केसमधील आरोपींना निर्दोष मुक्त केले वकिली क्षेत्रामध्ये असे काम करणे हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Thu 25th Aug 2022 03:40 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 25th Aug 2022 03:40 pm











