सज्जनगड घाटात चालकाचे नियंत्रण सुटून तवेरा गेली दरीत,चालक ठार
Satara News Team
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
- बातमी शेयर करा
सातारा: सज्जनगडावर जात असताना घाटात चालकाचे नियंत्रण सुटून तवेरा गाडी गेली दरीत,चालक ठार साताऱ्यातील सज्जनगड येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून सज्जनगडकडे निघालेल्या तवेराचा सज्जनगडचा घाट चढत असताना तीव्र वळणावर अपघात झालाय. या अपघातात तवेरा गाडीचे नियंत्रण सुटून गाडी 800 फूट खोल दरीत गेली यामध्ये अजित शिंगरे राहणार सज्जनगड यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा या अपघाताचा आवाज स्थानिक नागरिकांना आल्यानंतर नागरिकांनी दरीच्या दिशेने धाव घेतली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन संबंधित व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने आज सकाळी बाहेर काढण्यात यश आले असून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केला आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Fri 7th Apr 2023 04:16 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Fri 7th Apr 2023 04:16 pm













