शिवसेना सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांनी मुद्रीत केलेल्या दिनदर्शिकेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

सातारा : शिवसेना सातारा शहरप्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सातारा जिल्हा संपर्कप्रमुख श्री.निलेश मोरे यांनी मुद्रीत केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्याहस्ते साताऱ्यातील दरे येथील निवासस्थानी करण्यात आले.

 निलेश मोरे यांच्या कल्पकतेचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी कौतुक करत सर्वसामान्यांसाठी हि दिनदर्शिका उपयुक्त असून वैद्यकीय कक्षाचे काम या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहचणार आहे. असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी काढले. शिवसेना मदत कक्षाची इत्यंभूत माहिती देणारी दिनदर्शिका सातारा जिल्हातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार असून जनतेला कशी व कोणत्या प्रकारची वैद्यकीय सेवा दिली जाते,याची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळणार आहे. गरजू लोकांना या योजनेचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी सातारा शहरप्रमुख व वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख निलेश मोरे यांनी व्यक्त केला. 

 प्रकाशन प्रसंगी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना.भरतशेठ गोगावले , शिवनंदन बायोटेकचे मा.रूपेशजी संकपाळ, दिपक चव्हाण (जिल्हाप्रमुख, वैद्यकीय मदत कक्ष सातारा), अशिष शिंदे, रोहित शेंडे, सातारा शहरसंघटक अमोल इंगोले,किरण कांबळे,स्वराज जाधव,उपशहरप्रमुख विक्रम यादव,अमोल खुडे,शुभम भिसे,अजिंक्य राजपूत, कार्यालय प्रमुख ओंकार बर्गे, विभागप्रमुख सयाजी शिंदे,सिद्धेश जाधव,मनोज भोसले,विशाल वायदंडे,एझाज काझी,यश खत्री,उपविभाग प्रमुख आदित्य यादव, शाखाप्रमुख प्रथमेश बाबर,ऋषी शिवडावकर, अनिकेत भिसे, मनीष मेथा, शुभम मेनकुदळे,गौतम शिखरे,अमोल निमकर उपशाखा प्रमुख संदीप पवार, साईराज इथापे, आदी उपस्थित होते. इतर शिवसैनिक उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त