जमिन आणि पाण्यावर उतरणारी व उड्डाण घेणारी सी प्लेनची सुविधा निर्माण करावी..श्री.छ.खा.उदयनराजे

सातारा : शिवसागर जलाशय व धोम धरण जलाशयामध्ये जमिन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी उतरणारी व उड्डाण घेणारी सी प्लेनची सुविधा निर्माण करावी, अशी सूचना वजा मागणी आज खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या प्रकल्पाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाला वाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंदीय राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ यांच्या हवाई वाहतुक मंत्रालयाला दिलेल्या सूचनात्मक निवेदनात नमुद केले आहे की, सातारा जिल्हा हा विविधतेने नटलेला जिल्हा आहे. प्रचंड पर्जन्यमान आणि दुष्काळी भाग अश्या विरोधीभासी वातावरणातील सातारा जिल्हयातील सातारा, जावळी, वाई, महाबळेश्वर, पाटण हे तालुके दुर्गम आणि डोंगराळ म्हणून ओळखले जातात. जागतिक पातळीवर प्रसिध्द असलेली महाबळेश्वर आणि पांचगणी ही दोन थंड हवेची ठिकाणी लाखो भारतीय आणि परदेशी नागरीक पर्यटकांना साद घालत असतात. सातारा लोकसभा मतदार संघातील या वैशिटयामुळे येथे विकासात्मक पर्यटन रोजगाराची प्रचंड संधी आहे. महाराष्ट्र शासनाने जावली तालुक्यातील मुनावळे या गावात जलक्रीडा पर्यटन विकास साध्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसेच शिवसागर जलाशयामध्ये जागतिक स्तरावरील जलपर्यटनाची योजना देखिल मंजूर केली असून, त्याचीही कार्यवाही लवकरच सुरु होत आहे. या जलपर्यटन विकासाच्या जोडीला सुमारे 900 चौरस किलोमिटर अश्या विस्तीर्ण शिवसागर जलाशयात आणि सुमारे 20 चौरस किलोमिटरच्या धोम जलाशयातुन उड्डाण किंवा पाण्यावर उतरणारी सी प्लेन उपक्रम सुरु करणेबाबत हवाई वाहतुक मंत्रालयाने योजना राबवावी. अॅम्फीबायस प्लेन्सचा उपक्रम राबविल्यास, याठिकाणी आपोआप नवीन रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. केंद्राने नुकतेच मेघालय आणि आसाम राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावर अॅम्फीबायस प्लेन ची कार्यवाही सुरु केली आहे. त्यामळे तेथील भागाच्या विकासाला निर्णयात्मक प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्याभागाचा अमुलाग्र बदल होणार आहे. त्याच धर्तीवर कोयना शिवसागर आणि धोम जलाशयामध्ये जमिन आणि पाणी असा उभयचर उडडाण करणारी आणि उतरणा-या ( टेक ऑफ व लॅन्डींग ) सी प्लेनची सुविधा सुरु केल्यास विकासाच्या दृष्टीने चालना मिळणार आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निवेदनात नमुद केले आहे. 

 यावेळी ना.मुरलीधर अण्णांनी तातडीने कार्यवाही करतो असे आश्वासन देताना, महाराज साहेबांची सूचना आम्हाला काम करण्यास उत्साह निर्माण करते. याबाबत मी स्वतः लक्ष घालतो असेही आवर्जुन नमुद केले दरम्यान खा श्री छ. उदयनराजेमहाराज करीत असलेल्या विकासात्मक प्रयत्नांबाबत नागरीकांमध्ये समाधान पसरले आहे.

याप्रसंगी काका धुमाळ, विनित पाटील करण यादव इ. उपस्थित होते. , 


अॅम्फीबायस प्लेन मध्ये जमिनीवरुन आणि पाण्यावरुनही टेकऑफ किंवा लॅडींग होणा-या विमानांचा समावेश होतो. सर्वसाधारण पणे अश्या विमानांना सी प्लेन सुध्दा म्हटले जाते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त