फलटणचे आमदार श्री सचिन पाटील फलटण शहराच्या विकासाच्या ॲक्शन मोडवर
राजेंद्र बोंद्रे ::
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
- बातमी शेयर करा

फलटण : फलटण कोरेगाव विधानसभेचे आमदार श्री सचिन पाटील हे विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी फलटण शहराच्या बाबतीत स्वच्छ व सुंदर फलटण शहर करण्याच्या तयारीने कार्याला उभे राहिले आहेत.
त्यांनी नुकतीच बारामती शहराला भेट देऊन बारामतीत नागरिकांना अत्यावश्यक असणाऱ्या विविध विकास कामांच्या बाबतीत माहिती घेऊन फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे अभिजीत नाईक निंबाळकर माजी नगरसेवक सचिन अहिवळे आणि इतर सर्व जाणकार कार्यकर्त्यांच्या समवेत बारामती ला भेट दिली. बारामती येथे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री महेश रोकडे यांना समवेत घेऊन संपूर्ण शहरात असलेल्या विविध विकास कामांची सखोल माहिती घेऊन त्याच पॅटर्न प्रमाणे फलटण शहराचे सुशोभिकरण करणार आहोत,
अत्यावश्यक अशा सुविधा नवीन काळानुसार आवश्यक असणारे रचना, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी नाट्यगृह, पादचारी मार्ग, गटारे ,रस्त्यांची असणारी ठेवण, तसेच बारामती शहराला होणारा पाणी साठवण तलाव आणि पाणी टाकी चा विकास परीसर,या पद्धतीने फलटणमध्येही याचे कसे व्यवस्थापन करता येईल याचे अवलोकन करून आपल्या कार्याला सुरुवात करत आहेत. फलटणमध्ये असणाऱ्या अस्वच्छतेबाबत नुकतेच त्यांनी गंभीर दृष्ट्या माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत आणि नागरिकांच्या समवेत पाहणी करून स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे ,शहरातील बऱ्याच ठिकाणी असणारा कचरा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उचलून त्यांनी स्वच्छतेच्या बाबतीत एक पाऊल उचलले आहे ,याबाबत फलटण शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. भविष्यात फलटण शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याची जाणीव ठेवून प्रत्येक अत्यावश्यक सोयीसुविधा कशा उपलब्ध करून घेण्यात येतील आणि त्यासाठी लागणारा निधी मी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे,
नागरिकांच्या असणाऱ्या सर्व समस्या मी तात्काळ सोडवण्याचा ठाम निश्चय केला असून इथून पुढे फलटण शहरातील नागरिकांना असणाऱ्या समस्या बाबत मोकळा श्वास घेता येईल यासाठी फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री निखिल मोरे यांनी सांगितले की बारामती शहराच्या विकास संकल्पनेचा आम्ही अभ्यास करून फलटण शहराच्या विकासासाठी अजून ,काही नवीन योजना तयार करता येणार आहेत का, याचा अभ्यास करून सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन फलटणच्या नागरिकांना जेवढ्या जास्त चांगल्या सुविधा देता येतील यासाठी फलटण नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहणार आहोत.
त्याचबरोबर बारामती नगर परिषद चे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन बारामती शहराच्या विकासात जो अनुभव आम्हाला आला त्याचा फायदा नक्कीच फलटण नगरपालिकेच्या विकासासाठी होईल आणि त्यासाठी आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास सदैव तयार आहोत.
फलटण शहरातील सर्व जाणकार नागरिकांच्या सूचनांचा आदर करून माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून फलटण शहराची सर्वांगीण विकासाची भूमिका पार पाडण्यासाठी सदैव तत्पर असणार आहोत असेही आमदार श्री सचिन पाटील यांनी सांगितले
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
संबंधित बातम्या
-
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
-
माण खटावमधील प्रभाकर देशमुख, घार्गेंसह राष्ट्रवादी झाली दुबळी
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
-
साहेब, जिल्ह्याचे मालक नको तर पालक व्हा..
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
-
पुसेसावळीच्या सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कराड उत्तरचे आमदार आपल्या दारी
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
-
शिव आरोग्य सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक पार
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
-
अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी
- Sun 29th Dec 2024 04:51 pm
-
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
- Sun 29th Dec 2024 04:51 pm