हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
Satara News Team
- Mon 17th Mar 2025 10:40 am
- बातमी शेयर करा
सातारा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कोणतेही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही. आजपर्यंत बिनकामाचे नेतृत्व लाभल्याने हणबरवाडी- धनगरवाडी योजना पूर्ण झाली नाही. जाणून बुजून पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम करुन प्रत्येक निवडणुकीपूर्वीच्या काळात योजना मार्गी लागेल असा दिखाऊपणा दाखवला जात होता. मात्र हि योजना साडेतीन महिन्यात पहिल्या टप्प्यातील उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित झाली असून गायकवाडवाडी गावातील सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी या योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करून तलावात पाणी सोडणार असल्याचा निर्धार आ. मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला. ते गायकवाडवाडी ता. कराड येथील हणबरवाडी-धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा पहिल्या टप्प्यातील जल पूजन व अवघ्या साडेतीन महिन्यात बहुप्रतिक्षित योजना मार्गी लावल्याबद्दल येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या नागरी सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी वसंतराव जगदाळे,महेशबाबा जाधव, प्रमोद गायकवाड, संपत इंगवले, मोहन माने,पै.संतोष वेताळ, सुरेश पाटील, शंकर शेजवळ,विनायक भोसले,जयवंत जगदाळे, अशोक जाधव, दिनकर पाटील,नवनाथ पाटील प्रमोद जाधव, तुकाराम नलावडे, जितेंद्र मोरे, सीमा घार्गे,भानुदास पोळ,बाळासाहेब जाधव, जगन्नाथ जाधव, महेश जाधव, अरुण जाधव, सरपंच सौ.रेशमा पवार, उपसरपंच जयसिंग पवार, गोरख पवार, प्रशांत घोलप, गणेश जाधव,पुरंदर जाधव, श्रीकांत पाटील, संभाजी पवार, सर्जेराव पवार, गोरख पवार,युवराज पवार,समाधान पवार, रामचंद्र गायकवाड, धनाजी गायकवाड बजरंग घाडगे, रुपेश पवार, महेश पवार, अक्षय पवार, मनोज पवार, सतीश पाटील,किसन पाटील, मारुती पाटील, वैभव इंगळे, मारुती घोलप, अक्षय पाटील, उमेश वाघ, उमेश चव्हाण उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. मनोज घोरपडे म्हणाले की गायकवाडवाडी या गावातील दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढणार असून गायकवाडवाडी ते घोलपवाडी तसेच गायकवाडवाडी ते पाडळी व गायकवाडवाडी ते साठेवाडी (वाठार) या रस्त्यावर निधी उपलब्ध करून दळणवळणाची समस्या ही कायमस्वरूपी मार्गी लावणार आहे. हणबरवाडी- धनगरवाडी ही योजना गेली 40 वर्ष कागदावरच असल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला पाण्यापासून वंचित राहावे लागले. या योजनेतील पहिल्या टप्प्यातील उपसा जलसिंचन योजनेचे काम हे पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी प्रशासकीय सुधारित मान्यता मिळाल्याने येत्या दोन महिन्यात ही योजना पूर्णपणे मार्गी लागून गायकवाडवाडीचे पाण्याचे स्वप्न हे येथील तलावात पाणी सोडून केले जाणार असल्याचा निर्वाळा आ. मनोज घोरपडे यांनी दिला. या योजनेअंतर्गत साठेवाडी, वाठार, नागझरी तसेच अंतवडी, रिसवड या गावातील पूर्व भाग तसेच घोलपवाडी, निगडी, गोसाव्याचीवाडी हेळगाव, पाडळी आदी भागात या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून सारा परिसर सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही देत शामगाव, राजाचे कुर्ले या गावातील परिसरात टेंभू पाणी योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध केले जाणार असल्याची ग्वाही या कार्यक्रमात आ.घोरपडे यांनी दिली.
यावेळी सरपंच सौ. रेशमा पवार म्हणाल्या की टँकरचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या गावात विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळून पाणी घेऊनच गायकवाडवाडीत पाऊल ठेवले. दुसऱ्या टप्प्याचे लवकरात पूर्ण काम करून छत्रपती शासन मनोज दादांच्या रूपाने बघायला मिळाले. तुमची प्रेरणा घेऊनच आम्ही भविष्यात समाजकारण करणार असल्याचे सरपंच सौ. पवार यांनी नमूद केले.

यावेळी श्रीकांत पाटील, प्रमोद जाधव, विनायक भोसले, पै. संतोष वेताळ, संपतराव इंगवले, सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड यांनी आपल्या मनोगतांमध्ये आ. मनोज घोरपडे यांच्या कामाच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत येणाऱ्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत सर्वांनी एकसंघ राहून आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख पवार व संभाजी माने यांनी केले. कार्यक्रमाचा सत्कार समारंभ मनोज पवार यांनी केला तर आभार सर्जेराव पवार यांनी मानले. यावेळी गावातील सर्व महिलांसह तरुण वर्ग, सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Mon 17th Mar 2025 10:40 am
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Mon 17th Mar 2025 10:40 am
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Mon 17th Mar 2025 10:40 am
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 17th Mar 2025 10:40 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Mon 17th Mar 2025 10:40 am
संबंधित बातम्या
-
अखाड्यात शिंदेंच्या होमपीचवर राजेगटाचा राजकीय डाव यशस्वी; ६ विरुद्ध ५ मतांनी ठराव मंजूर
- Mon 17th Mar 2025 10:40 am
-
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत व्हीडीके कंपनीचा स्वच्छता ठेका रद्द
- Mon 17th Mar 2025 10:40 am
-
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Mon 17th Mar 2025 10:40 am
-
हातगेवर विकास सेवा सोसायटीत कर्जप्रकरणी फसवणुकीचा आरोप; सहाय्यक पोलीस निरीक्षक, मेढा यांच्याकडे तक्रार दाखल
- Mon 17th Mar 2025 10:40 am
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Mon 17th Mar 2025 10:40 am












