विसापूर येथे बैलगाडा जंगी शर्यती 11मे रोजी होणार
कोण होणार विसापूर नामदार केसरीचा मानकरी ?
निसार शिकलगार - Sun 7th May 2023 02:30 pm
- बातमी शेयर करा
विसापूर : विसापूर तालुका खटाव येथे दि.28 रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते परंतु दिवसभर पावसामुळे या शर्यतीचे नियोजन पुढे ढकलण्यात आले होते. दिनांक 11 मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून आयोजन करण्यात आले असून,.या भव्य ओपन मैदान बैलगाडा जंगी शर्यती स्पर्धेमध्ये एक ते सहा नंबर साठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती संयोजक पिंटू साळुंखे यांनी दिली असून या शर्यतिमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे.
विसापूर तालुका खटाव येथे दिनांक 11 मे रोजी सकाळी नऊ वाजता माननीय नामदार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये व प्रमुख पाहुणे मा. खासदार उदयनराजे भोसले,आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांचे उपस्थितीमध्ये होणार आहेत. सदर या शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी 1लाख रुपये द्वितीय 51 हजार रुपये, तृतीय 25 हजार रुपये, पंधरा हजार, दहा हजार, पाच हजार, अशी राहणार आहेत प्रवेश फी पंधराशे रुपये राहील स्पर्धा शासनाच्या नियमाप्रमाणे घेतल्या जातील अकरानंतर येण्याऱ्या स्पर्धकांच्या गाडी नोंद केल्या जाणार नाही.अपघातास आयोजक,संयोजक राहणार नाहीत स्पर्धेत पंचांचा निर्णय अंतिम राहील.सर्व गटातील गाडयांचा निकाल पारदर्शकरित्या स्क्रीनवर पाहून दिला जाईल. बैलगाडी नोंद संपर्क संजय पैलवान आवार वाडी मोबा.9273227758,तानाजी वलेकर उंबरमळे मोबा.7498750411,अनिल बुधवाले आवरवाडी,अनिल काटकर,संतोष देशमुख यांचेकडे नोंद करण्यात यावीत
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Sun 7th May 2023 02:30 pm
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sun 7th May 2023 02:30 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sun 7th May 2023 02:30 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sun 7th May 2023 02:30 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sun 7th May 2023 02:30 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 7th May 2023 02:30 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 7th May 2023 02:30 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 7th May 2023 02:30 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 7th May 2023 02:30 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 7th May 2023 02:30 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 7th May 2023 02:30 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 7th May 2023 02:30 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 7th May 2023 02:30 pm













